रोहित शर्मा-एमएस धोनी (Photo Credit: Getty)

इंडियन प्रीमियर लीग 2020 (Indian Premier League) 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) येथे सुरू होत आहे. संघांसाठी कोणत्याही प्रकारचा घरगुती खेळपट्टीचा फायदा होणार नाही आणि अशा प्रकारे ‘स्तरीय खेळाचे मैदान’ असेल. तथापि, काही संघ आवडीचा म्हणून सुरूवात करतील आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) त्या यादीत अव्वल स्थानावर असेल. रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघ आयपीएलमधील सर्वात धोकादायक संघ (Most Dangerous Team In IPL) आहे. मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात सातत्यपूर्ण संघ राहिला आहे आणि स्पर्धेच्या इतिहासात अनेकदा प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. आयपीएल (IPL) 2020 च्या पूर्वी आपण 'या' 4 आकडेवारींवर नजर टाकूया जे मुंबई इंडियन्स हा सर्वात धोकादायक संघ आहे आणि यावर्षीही जेतेपद मिळवण्यासाठी आवडता असल्याचे सिद्ध करते. (IPL 2020: धवल कुलकर्णीने मुंबई इंडियन्स फॅन्ससोबत मराठमोळ्या अंदाजात शेअर केली लॉकडाउन स्टोरी, चाहत्यांद्वारे व्हिडिओचे कौतुक Watch Video)

1- सर्वाधिक विजय: सर्वाधिक आयपीएल सामने जिंकण्याचा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे. मुंबई इंडियन्सने आजवर 187 आयपीएल सामने खेळले ज्यात ज्यातील सर्वाधिक 107 विजयांसह चार वेळा चॅम्पियन लीडर बोर्डाच्या पहिल्या स्थानावर आहेत. 100 आयपीएल विजयांसह चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) दुसर्‍या स्थानावर आहे.

2- सर्वाधिक जेतेपद: इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात चार विजेतेपदांसह मुंबई इंडियन्स सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. 2013, 2015, 2017 आणि 2019 मध्ये मुंबईने विजेतेपद जिंकले.  मुंबई इंडियन्सने 5 वेळा (2010, 2013, 2015, 2017, 2019) आयपीएलच्या अंतिम सामन्यात सातत्याने स्थान मिळवले, जे दुसरे सर्वाधिक आहे.

3- मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा: मुंबईच्या ताफ्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे फलंदाज आहेत. रोहित शर्मा, क्रिस लिन, क्विंटन डी कॉक उत्तम सलामी फलंदाज आहेत. रोहितने कर्णधारऐवजी फलंदाज म्हणून देखील मुंबईच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे. कर्णधार रोहितने मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. 143 सामन्यात त्याने 3728 धावा केल्या असून त्यात एक शतक आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे. दुसरीकडे, क्विंटन डी कॉकने मागील हंगामात टीमकडून सर्वाधिक 529 धावा केल्या आणि यंदाही तो आपल्या फॉर्मची पुनरावृत्ती करू इच्छित असेल.

4- सर्वात यशस्वी कर्णधार: आयपीएलमधील सर्वात अनुभवी कर्णधार म्हणून रोहितविरुद्ध शंका नाही. धोनीच्या आयपीएल विजयी टक्केवारीत रोहित मागे असला तरी रोहितने मुंबई फ्रँचायझीला चार विजेतेपद मिळवून दिले जे आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक आहेत. त्याने कर्णधार म्हणून 104 सामने खेळले असून आणि 60 सामन्यात संघाला विजय मिळवून दिला आहे. 42 सामन्यात पराभव झाला असून दोन सामने अनिर्णित राहिले.

इंडियन प्रीमियर लीगची 13 वी आवृत्ती 19 सप्टेंबरला अबू दाभी येथे सुरू होईल. गतवर्षी चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि लीगच्या इतिहासातील दुसरी सर्वात यशस्वी टीम चेन्नई सुपर किंग्स आमने-सामने येतील.