IPL 2020: धवल कुलकर्णीने मुंबई इंडियन्स फॅन्ससोबत मराठमोळ्या अंदाजात शेअर केली लॉकडाउन स्टोरी, चाहत्यांद्वारे व्हिडिओचे कौतुक (Watch Video)

मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीने नुकतेच लॉकडाऊन दरम्यान प्रशिक्षणातील आपला अनुभव शेअर केला असून मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडियावर पोस्ट केलेला भावनिक व्हिडिओ चाहत्यांना पसंत पडत आहे. धवलने हा संपूर्ण अनुभव खास मराठमोळ्या अंदाजात व्यक्त केला. बऱ्याच चाहत्यांनी मराठीमध्ये कॅप्शन लिहिल्याबद्दल फ्रँचायझीचे आणि गोलंदाजांचे देखील कौतुक केले.

IPL 2020: धवल कुलकर्णीने मुंबई इंडियन्स फॅन्ससोबत मराठमोळ्या अंदाजात शेअर केली लॉकडाउन स्टोरी, चाहत्यांद्वारे व्हिडिओचे कौतुक (Watch Video)
धवल कुलकर्णीने शेअर केली लॉकडाउन स्टोरी (Photo Credit: Twitter/mipaltan)

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी (Dhawal Kulkarni) इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 2020 साठी फ्रँचायझीसाठी महत्वाची भूमिका निभावणार आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा या स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे, उर्वरित वेगवान गोलंदाजांवर स्पर्धेदरम्यान अनुभवी श्रीलंकन गोलंदाजांची जागा भरण्याची अतिरिक्त जबाबदारी असणार आहे. दुखापतीनंतर क्रिकेटच्या मैदानावर परतणाऱ्या कुलकर्णीने नुकतेच लॉकडाऊन (Dhawal Kulkarni Lockdown Story) दरम्यान प्रशिक्षणातील आपला अनुभव शेअर केला असून मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडियावर पोस्ट केलेला भावनिक व्हिडिओ चाहत्यांना पसंत पडत आहे. मुंबईने ऑनलाईन शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये धवल त्याच्या दुखापतीतून सावरणे, यंदा आयपीएल अगोदर बायो-बबलच्या आत एकांतवासात घालवण्याचा आणि प्रशिक्षण घेण्याच्या अनुभवाविषयी बोलताना दिसला. (MI vs CSK, IPL 2020: चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सामन्यासाठी अशी असेल रोहित शर्माची पलटन)

व्हिडिओच्या सुरुवातीच्या भागात क्रिकेटपटू असल्याने त्याला बाहेरील प्रशिक्षणाची सवय होती आणि लॉकडाऊन दरम्यान कैद राहणे कसे कठीण होते याबद्दल धवलने सांगितले. धवल कुलकर्णीने लॉकडाउन त्याच्यासाठी कसे फायदेशीर ठरले याबद्दलही उघड केले. यंदाचे मार्च महिन्यात आयोजित होणारे आयपीएल पुढे ढकलल्यामुळे त्याला दुखापतीतून पूर्णपणे सावरण्याची संधी कशी मिळाली यावर त्याने प्रकाश टाकला. धवलला डिसेंबर 2019 मध्ये रणजी करंडक हंगामात हॅमस्ट्रिंग इजा झाली होती.

दरम्यान, धवलने हा संपूर्ण अनुभव खास मराठमोळ्या अंदाजात व्यक्त केला. बऱ्याच चाहत्यांनी मराठीमध्ये कॅप्शन लिहिल्याबद्दल फ्रँचायझीचे आणि गोलंदाजांचे देखील कौतुक केले. पाहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया: 

मराठीत व्यक्त होत रहा

आपल्या पणाची भावना वाढते..

मस्त वाटले...

अशीच मराठी वापरत रहा

खूप छान वाटले तुमचे मराठी ऐकून..

एक नंबर

19 सप्टेंबर रोजी आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात गतविजेता मुंबई इंडियन्स आणि उपविजेता चेन्नई सुपर किंग्ज 13 व्या मोसमाची सुरुवात करतील. मुंबई इंडियन्सची यंदा त्यांच्या पाचव्या तर पहिल्यांदा सलग दुसरे विजेतेपद पटकावण्याच्या प्रयत्नात असेल. आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम, मुंबई इंडियन्स, पेपरवर प्रबळ दिसून येत आहे. त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडूंसह युवा क्रिकेटपटूंचीही साथ आहे आणि यंदा विजेतेपदाचे मुख्य दावेदार मानले जात आहे. मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सलामीचा सामना अबू धाबीमधील शेख झायद स्टेडियमवर खेळला जाईल.

(The above story first appeared on LatestLY on Sep 14, 2020 03:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).