आशिया चषक 2023 चा (Asia Cup 2023) अंतिम सामना रविवारी कोलंबो येथे भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात होणार आहे. या विजेतेपदासाठी दोन्ही संघांनी तयारी पूर्ण केली आहे. मात्र, याआधीही सुपर-4 मध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या क्लोज मॅचमध्ये भारतीय टीमने श्रीलंकेचा 41 रन्सनी पराभव केला होता, पण हा सामना त्यापेक्षा जास्त रोमांचक असेल यात शंका नाही. अंतिम फेरीत विजयी होणाऱ्या संघाला चमकदार ट्रॉफीसह करोडो रुपये मिळतील. यावेळी आशिया चषकाची बक्षीस रक्कम किती असू शकते हे जाणून घेऊया. (हे देखील वाचा: IND vs SL, Asia Cup Final 2023: टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात होणार महामुकाबला, फायनलमध्ये सगळ्यांच्या नजरा असणार 'या' महान खेळाडूंवर)
विजेत्याला सघांला मिळणार 2 कोटी रुपये
गेल्या वर्षी श्रीलंकेने टी-20 फॉरमॅटमध्ये आशिया कप जिंकला होता. त्याला ट्रॉफीसह बक्षीस म्हणून 1.59 कोटी रुपये मिळाले. तर पाकिस्तानला उपविजेते म्हणून 79 लाख रुपये देण्यात आले. अहवालांवर विश्वास ठेवला तर, यावेळी विजेत्याला सुमारे 2 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जाऊ शकतात. बीसीसीआयने याची अधिकृत घोषणा केली नसली तरी यावेळी विजेते आणि उपविजेत्याला पूर्वीपेक्षा जास्त पैसे मिळतील असे बोलले जात आहे. दरम्यान, आशियाई क्रिकेट परिषदेने आशिया कप ट्रॉफीबाबत माहिती दिली आहे. आशियाई क्रिकेट परिषदेनुसार आशिया कप ट्रॉफी कोलंबोला पोहोचली आहे.
टीम इंडियाने सर्वाधिक वेळा फायनल जिंकली आहे
आशिया कप फायनलमध्ये टीम इंडिया फेव्हरिट आहे. तिने सर्वाधिक वेळा फायनल जिंकली आहे. भारतीय संघाने 10व्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर आठव्यांदा भारत आणि श्रीलंका यांच्यात अंतिम सामना होणार आहे. भारतीय संघाने 7 वेळा तर श्रीलंकेने 6 वेळा हे विजेतेपद पटकावले आहे. पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर श्रीलंकेचे मनोबल उंचावले आहे, तर भारतीय संघ बांगलादेशकडून पराभूत झाला आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघ बांगलादेशकडून झालेल्या पराभवातून सावरतो आणि अंतिम फेरीत कशी कामगिरी करतो हे पाहणे रंजक ठरेल.