Mohammed Siraj (photo Credit - X)

Australian Men's National Cricket Team vs India National Cricket Team: ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND s AUS) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 (Border-Gavaskar Trophy 2024-25) मालिकेतील चौथा बॉक्सिंग डे कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. 3 सामन्यांनंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. दरम्यान, पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने दिवसाअखेर 6 विकेट गमावून 311 धावा केल्या आहे. स्टीव्हन स्मिथ 68 तर पॅट कॅमिन्स 8 धावांवर नाबाद आहे. तर भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या आहे.

मोहम्मद सिराजच्या 'ट्रिक'ने पुन्हा केला चमत्कार

त्याआधी, डावाच्या व्या 43व्या षटकात जबरदस्त घटना घडली. दुसरा चेंडू टाकल्यानंतर मोहम्मद सिराजने स्ट्रायकर्स एंडकडे जाऊन बेल्सची अदलाबदल केली. मग मार्नस लॅबुशेन स्ट्राइकवर होता, ज्याला ही युक्ती पाहून आश्चर्य वाटले. यानंतर डावाच्या 45व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर उस्मान ख्वाजा भारतीय वेगवान गोलंदाज बुमराहचा बळी ठरला. (हे देखील वाचा: Virat Kohli vs Sam Konstas Heated Argument: विराट कोहलीसोबत झालेल्या वादावर सॅम कॉन्स्टासची आली प्रतिक्रिया, जाणून घ्या काय म्हणाला तो?)

जसप्रीत बुमराहला मिळाली विकेट

बुमराहने शॉर्ट पिच बॉल टाकला, ज्यावर ख्वाजा पुल शॉट खेळायला गेला, पण त्याचा शाॅट खूपच खराब होती. शॉर्ट मिडविकेटवर उपस्थित असलेल्या केएल राहुलने अतिशय सोपा झेल घेतला. बुमराहपासून राहुलपर्यंत आणि ख्वाजापासून ऑस्ट्रेलियन संघापर्यंत कांगारू फलंदाजाना यावर विश्वास बसत नव्हता. मोहम्मद सिराजच्या बेल्सच्या अदलाबदलीचा फायदा बुमराहला झाला आणि ख्वाजाचा डाव संपुष्टात आल्याचे मानले जाते.