अटक वॉरंट जारी केल्यानंतर 'या' दिवशी भारतात परतणार मोहम्मद शमी, BCCI ने केला मोठा खुलासा
(Photo Credits: Twitter)

वेस्ट इंडीजचा दौरा संपल्यानंतर भारताचे अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) अमेरिकेला (US) रवाना झाला असला तरी तो त्याच्या वकिलासह बीसीसीआयशी (BCCI) सतत संपर्कात आहे. पत्नी हसीन जहाँ (Hasin Jahan) ने त्याच्याविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत कोलकाताच्या अलिपूर कोर्टाने त्याला 15 दिवसात शरण जाण्याचे आदेश दिले आहेत. शमीविरुद्ध 2 सप्टेंबर रोजी अटक वॉरंट जारी करण्यात आले होते आणि आता विंडीज दौरा संपल्याने शमी या वॉरंटला असा समोरा जातो यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, वृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, शमी 12 सप्टेंबरला भारतात परत येईल आणि तोपर्यंत तो त्याचा वकील सलीम रहमान त्यांच्या संपर्कात आहे. (क्रिकेटर मोहम्मद शमी याच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी केल्यानंतर पत्नी हसीन जहाँ यांनी केले 'हे' मोठे विधान, वाचा सविस्तर)

बोर्ड अधिकाऱ्याने म्हटले की, "वेस्ट इंडिजचा दौरा संपल्यानंतर शमी अमेरिकेला रवाना झाला आहे आणि १२ तारखेला तो मायदेशी परतणार आहे. कोर्टाच्या खटल्याबाबत तो आपल्या वकिलाशी सातत्याने संपर्कात असतो आणि त्यांनी संबंधित लोकांशीही बोलला आहे." कोर्टाचा आदेश जारी झाल्याच्या दिवशी बीसीसीआयने स्पष्ट केले की दोषारोपपत्र जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत शमीवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले होते की, "या प्रकरणात कोणतीही कारवाई करणे फार लवकर होईल आणि आरोपपत्र मिळाल्यानंतरच कोणतीही कारवाई केली जाऊ शकते."

त्यानंतर हे शमीच्या वकिलानेही स्पष्ट केले की ते अटक वॉरंट नव्हते आणि वेगवान गोलंदाजाला कोर्टात शरण जाण्यास सांगितले गेले. दुसरीकडे, आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत क्रिकेटपटू शमीच्या पत्नीने हे स्पष्ट केले होते की शमीला आता यातून पळ काढता येणार नाही. जहाँ म्हणाली, "आसाराम बापू आणि राम रहीम कायद्यातून सुटू शकले नाहीत तर त्यांच्यासमोर शमी कोण आहे? मी दीड वर्षांपासून संघर्ष करीत आहे. मी निराश होत होतो. मी आर्थिकदृष्ट्या मजबूत नव्हती किंवा मला कसलाही आधार मिळाला नाही. मी खूप कष्ट करतोय पण मला आशा दिसत नव्हती, मी हार मानत होते. असं वाटतं की प्रकरण दडून राहील, पण अल्लाहचे आभार, सत्य नेहमीच जिंकते."