Shami Becomes Saviour: मोहम्मद शमीने वाचवले अपघातग्रस्त प्रवाशाचे प्राण; सोशल मीडियावर शेअर केला नैनितालमधील रस्ता अपघाताचा व्हिडिओ
मोहम्मद शमीने प्रवाशाचे प्राण वाचवले (PC - Instagram)

Shami Becomes Saviour: विश्वचषक 2023 मध्ये भारताला अनेक सामने स्वबळावर जिंकून देणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) आता मसिहा बनल्याचं दिसत आहे. नैनितालमध्ये खड्ड्यात पडलेल्या कारमधून त्याने एका व्यक्तीला वाचवले आहे. खुद्द शमीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही माहिती दिली आहे. शमीने शनिवारी ही पोस्ट केली. त्याने लिहिले- तो (कार असलेली व्यक्ती) खूप भाग्यवान आहे. देवाने त्याला दुसरे जीवन दिले. त्याची गाडी नैनितालजवळच्या डोंगरी रस्त्यावर माझ्या गाडीच्या समोरच पडली. आम्ही त्याला सुखरूप बाहेर काढले.

शमीने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. शमीने लिहिले आहे की, 'मी एखाद्याला वाचवण्यात आनंदी आहे. तो खूप भाग्यवान आहे की देवाने त्याला दुसरे जीवन दिले आहे. व्हिडिओमध्ये शमीही त्या व्यक्तीच्या दुखापतीवर मलमपट्टी करताना दिसत आहे. शमीचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. ही घटना कशी घडली याबाबत शमीने कोणतीही माहिती दिली नाही. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत शमी जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. शमी या विश्वचषकात सर्वाधिक 24 बळी घेणारा गोलंदाज ठरला होता. पहिले चार सामने खेळले नसले तरी शमीने शानदार गोलंदाजी केली. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये टीम इंडियाला काही खास करता आले नाही आणि भारताला पराभव पत्करावा लागला. टूर्नामेंटनंतर शमीने एका शोदरम्यान त्याच्या वाईट टप्प्याबद्दल उघडपणे सांगितले. मानसिक आरोग्यावरही त्यांनी विधाने केली. (हेही वाचा - Mohammed Shami: दसऱ्याच्या शुभेच्छा देणाऱ्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर मोहम्मद शमी, अनुराग ठाकूर आले बचावासाठी)

शमीला एका कार्यक्रमादरम्यान एका मुलाखतीत विचारण्यात आले होते की, जेव्हा तुम्ही मानसिक आरोग्याविषयी बोलत असता तेव्हा तुमच्या आयुष्यातील कठीण काळ कोणता होता? त्यावेळी तुमच्या आत काय चालले होते? यावर शमी म्हणाला, सुरुवातीला खूप कठीण होते, कारण माझ्या कुटुंबात असे काही घडले नाही. आम्ही एक सामान्य कुटुंब आहोत. तो एक कठीण काळ होता, तणावपूर्ण काळ होता.

तथापि, मोहम्मद शमी येथे कोणत्या घटनेबद्दल बोलत होता हे स्पष्ट झालं नाही, परंतु गेल्या काही वर्षांत तो चढ-उतारांमधून गेला आहे. शमी येथे पत्नी हसीन जहाँने केलेल्या आरोपांबाबत बोलत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हसीनने शमीवर आपली फसवणूक आणि इतर महिलांसोबत संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याच्यावर देशाचा विश्वासघात आणि मॅच फिक्सिंगचाही आरोप होता.

मात्र, शमीला बीसीसीआयचा पूर्ण पाठिंबा मिळाला. देशाशी गद्दारी करण्यापेक्षा आपण आपल्या प्राणांची आहुती देऊ, असे त्याने फार पूर्वी एका मुलाखतीत म्हटले होते. शमीने 2015, 2019 आणि 2023 मध्ये भारतासाठी तीन विश्वचषक खेळले आहेत. तीन विश्वचषकांमध्येच तो या मेगा टूर्नामेंटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे.