Pakistan Cricket Board: पाकिस्तान क्रिकेटमध्ये (PCB) रोज काही ना काही हालचाल होत असते. पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. यावेळी मोठा खळबळ उडण्याचे कारण म्हणजे माजी दिग्गज खेळाडूने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. खरेतर, पाकिस्तान क्रिकेट संघाचे निवडक म्हणून नियुक्त केलेले माजी दिग्गज पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद युसूफ (Mohammad Yousuf) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मोहम्मद युसूफने हे पद सोडल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. युसूफच्या या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. युसूफ आपले पद सोडेल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती.
युसूफ यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफने आपल्या राजीनाम्याची माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली. आपल्या अधिकृत X वरुन राजीनामा दिल्याची माहिती देताना युसूफ यांनी याचे कारण सांगितले आहे. युसूफ यांनी लिहिले की, “मी वैयक्तिक कारणांमुळे पाकिस्तान क्रिकेट संघाच्या निवडकर्ता पदाचा राजीनामा देत आहे. या संघाची सेवा करणे हा एक मोठा सन्मान आहे. पाकिस्तान क्रिकेटच्या वाढीसाठी आणि यशात योगदान दिल्याचा मला अभिमान आहे. संघातील खेळाडूंच्या कौशल्यावर आणि भावनेवर माझा पूर्ण विश्वास आहे. मी आमच्या टीमला शुभेच्छा देतो.
I announce my resignation as a selector for the Pakistan cricket team due to personal reasons. Serving this incredible team has been a profound privilege, and I am proud to have contributed to the growth and success of Pakistan Cricket.
I have immense faith in the talent and…
— Mohammad Yousaf (@yousaf1788) September 29, 2024
पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध मालिका खेळायची आहे
मोहम्मद युसूफचा राजीनामा अशा वेळी आला आहे जेव्हा पाकिस्तान संघ आगामी 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या तयारीत व्यस्त आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील ही कसोटी मालिका 7 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी पाकिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, उर्वरित दोन सामन्यांसाठी संघ जाहीर व्हायचा होता. अशा स्थितीत अन्य दोन सामन्यांपूर्वी युसूफचा राजीनामा हा सर्वांसाठीच धक्कादायक निर्णय आहे.