Scotland Women National Cricket Team vs Pakistan Women National Cricket Team, ICC Womens T20 World Cup Warm-up Matches, 2024 1st Match: ICC महिला T20 विश्वचषक (ICC Women's T20 World Cup 2024) 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. महिला टी-20 विश्वचषक सलग दुसऱ्या वर्षी आयोजित केला जात आहे. यावर्षी ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली जाणार आहे. स्पर्धेचा हा नववा हंगाम 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान दुबई आणि शारजाह येथे खेळवला जाईल. दरम्यान, आजपासून या स्पर्धेचे सराव सामने खेळवले जात आहेत. सरावाचा पहिला सामना स्कॉटलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला गेला. उभय संघांमधील हा सामना दुबईतील द सेव्हन्स स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात स्कॉटिश संघाने मोठा अपसेट केला आहे. स्कॉटलंड संघाने पाकिस्तानचा आठ गडी राखून पराभव केला आहे. (हेही वाचा - Sri Lanka Women Beat Bangladesh Women: दुसऱ्या सराव सामन्यात श्रीलंकेचा बांगलादेशवर 34 धावांनी विजय; सुगंधिका कुमारीचे 3 विकेट )
पहिल्या सराव सामन्यात पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि अवघ्या 33 धावा करून संघाचे चार फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. पाकिस्तान संघाला निर्धारित 20 षटकात 9 विकेट गमावून केवळ 132 धावा करता आल्या. पाकिस्तानकडून ओमामा सोहेलने 30 धावांची शानदार खेळी केली. ओमामा सोहेलशिवाय मुनिबा अलीने 27 धावा केल्या.
पाहा पोस्ट -
🚨Big Setback for Pakistan 🚨
Scotland Women Cricket Team Beats Pakistan Women Cricket Team by 8 wickets in Warmup match before T20 World Cup.
Pakistan-132/9 in 20 overs
Scotland-133/2#Cricket #WarmupT20worldcup#PakvsSco #T20WorldCup pic.twitter.com/7VWPpa0h5O
— Sports Zone (@rohit_balyan) September 28, 2024
हा सामना जिंकण्यासाठी स्कॉटिश संघाला 20 षटकात 132 धावा करायच्या होत्या.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या स्कॉटिश संघाची सुरुवात चांगली झाली आणि पहिल्या विकेटसाठी दोन्ही सलामीवीरांनी आक्रमक फलंदाजी करत 78 धावांची भागीदारी रचली. स्कॉटिश संघाने अवघ्या 18 षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. स्कॉटलंडसाठी सलामीवीर सारा ब्राइसने सर्वाधिक नाबाद 60 धावांची खेळी खेळली. या खेळीदरम्यान सारा ब्राईसने दोन षटकार आणि तीन चौकार लगावले. सारा ब्राइसशिवाय सास्किया हॉर्लेने 48 धावा केल्या. पाकिस्तानकडून नशरा संधूला एक विकेट मिळाली.