Sri Lanka Women National Cricket Team vs Bangladesh Women National Cricket Team, ICC Womens T20 World Cup Warm-up Matches, 2024 2nd Match Scorecard: ICC महिला T20 विश्वचषक (ICC Women's T20 World Cup 2024) 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. महिला टी-20 विश्वचषक सलग दुसऱ्या वर्षी आयोजित केला जात आहे. यावर्षी ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली जाणार आहे. स्पर्धेचा हा नववा हंगाम 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान दुबई आणि शारजाह येथे खेळवला जाईल. दरम्यान, आजपासून या स्पर्धेचे सराव सामने खेळवले जात आहेत. सरावाचा दुसरा सामना श्रीलंका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जात गेला. उभय संघांमधील हा सामना दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर खेळला जात गेला. या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशवर 34 धावांनी विजय प्राप्त केला. श्रीलंकेने दिलेल्या 145 धावांचे आव्हान बांगलादेशला पेळवले नाही आणि त्यांचा डाव 110 धावांपर्यंतच पोहचला. (हेही वाचा - Sri Lanka Women vs Bangladesh Women, 2nd Match Live Toss Update: दुसऱ्या सराव सामन्यात बांगलादेशची कर्णधार निगार सुलतानाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय)
दुसऱ्या सराव सामन्यात बांगलादेशची कर्णधार निगार सुलतानाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 37 धावा जोडल्या. श्रीलंकेच्या संघाने 20 षटकांत सात गडी गमावून 144 धावा केल्या. श्रीलंकेसाठी हसनी परेराने 43 धावांची शानदार खेळी केली. या खेळीदरम्यान हसनी परेराने 39 चेंडूत तीन चौकार मारले. हसनी परेराशिवाय नीलाक्षी डी सिल्वाने 30 धावा केल्या.
यावेळी 145 धावांचे आव्हान मैदानात उतरलेल्या बांग्लादेश संघाची सुरुवातीपासून खराब झाली. कर्णधार निगार सुलतान (30) आणि दिशा बिश्वास (26) यांच्या व्यतिरीक्त कोणालाच चांगली खेळी साकारता आली नाही. सुगंधिका कुमारी आणि इनोशी प्रियदर्शिनी यांनी शानदार गोलंदाजी करत बांगलादेशचा मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले.