माइकल वॉन (Photo Credit: Getty Images)

पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकसाठी प्रत्येक संघ जय्यत तयारीला लागला. आहे. यजमान ऑस्ट्रेलियापासून भारत (India)-श्रीलंका संघही या स्पर्धेसाठी त्यांच्या खेळाडूंच्या नियुक्तीसाठी तयारी करत आहे. या स्पर्धेपूर्वी इंग्लंडचा माजी खेळाडू माइकल वॉन (Michael Vaughan) याने एक मोठी भविष्यवाणी केली ज्याच्यावर सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. या स्पर्धेच्या जेतेपदासाठी त्याने ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड (England) संघाला दावेदार मानले आहे. वॉनने टी-20 विश्वचषक स्पर्धेबद्दल ट्विट केले आणि लिहिले की ही 'थोडी घाई आहे, परंतु पुढील टी-20 विश्वचषक चॅम्पियन इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियापैकी एक असेल.'वॉनने हे ट्विट न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंड संघाच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील विजयानंतर केले होते. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघाने पाकिस्तानला 2-0 ने पराभूत करत मालिकेत क्लीन-स्वीप केला. वॉनच्या या ट्विटनंतर लगेचच चाहत्यांनी त्याला सोशल मीडिया साइटवर ट्रोल करण्यास सुरुवात केली. (T20 World Cup 2020 : 'हे' 6 संघ विश्वचषक स्पर्धेसाठी ठरले पात्र)

वॉनने भारताचे नाव घेतले नाही आणि याने सर्वांना आश्चर्यात टाकले. वॉनने टीम इंडियाला पसंती न दिल्याची तक्रारही यूजर्सने केली. हा प्रश्न फक्त भारतीय क्रिकेट चाहत्यांनाच नाही तर इतर देशांच्या लोकांनीही हाच प्रश्न उपस्थित केला. एका यूजरने लिहिले की, 'आता बाउंड्री काउंटचा नियम काढून टाकला आहे, तेव्हा इंग्लंडला कायद्याच्या पुस्तकात आणखी एक त्रुटी शोधावी लागेल,' तर दुसर्याने  लिहिले, "एकदा भविष्यवाणी योग्य ठरल्यास आपण स्वत:ला देव मानू लागतात."

बाउंड्री काउंटचा नियम काढून टाकला आहे, तेव्हा इंग्लंडला कायद्याच्या पुस्तकात आणखी एक त्रुटी शोधावी लागेल

त्यांच्याकडे मैदानावर 12 क्षेत्ररक्षक + धर्मसेना आहेत हे सुनिश्चित करावे...

एकदा भविष्यवाणी योग्य ठरल्यास आपण स्वत:ला देव मानू लागला

दिवसाचा विनोद

वॉन अनेकदा सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करतात परंतु यंदा अनेक भारतीय चाहते त्यांच्या या मतावर निराश झाले आहेत. आता कोणता संघ टी-20 विश्वचषक जिंकतो हे पाहणे उत्साहाचे ठरेल. सर्व संघ क्रिकेटच्या या छोट्या फॉर्ममध्ये चांगले प्रदर्शन करत आहे. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया संघाने तर नुकतंच आयसीसी रँकिंगच्या पहिल्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानचा क्लीन-स्वीप केला आहे.