T20 World Cup 2020 : 'हे' 6 संघ विश्वचषक स्पर्धेसाठी ठरले पात्र
World Champion Team England. (Photo Credits: Getty Images)

आस्ट्रेलियामध्ये (Australia) पार पडणाऱ्या  टी-20 विश्वचषक 2020 (T20 World Cup 2020) स्पर्धेतील सगळे संघ निश्चित झाले आहेत. येत्या विश्वचषक टी-20 स्पर्धेत नवे 6 संघ मैदानात उतरणार आहे. महत्वाचे म्हणजे, या विश्वचषक स्पर्धेत आणि जागतिक क्रमवारीतील सर्वोत्तम 9 संघाना थेट प्रवेश देण्यात आला आहे. तर पात्रता फेरीतील सामन्यांनंतर उर्वरित आयर्लंड. नामिबिया, नेदरलॅंड, पापुआ न्यू गिनी, ओमान आणि स्कॉटलँड या देशाला या स्पर्धेत संधी मिळाली आहे. गेल्या विश्वचषकात आयर्लंड आणि नेदरलॅंड या संघाने उत्तम कामगिरी करुन सर्वाचे लक्ष त्यांच्याकडे केंद्रीत केले होते. तसेच टी-20 विश्वचषक 2020 मध्ये नामिबिया आणि पापुआ न्यू गिनी पहिल्यांदाच मैदानात दिसणार आहे.

थेट प्रवेश मिळालेले संघ :

1)  भारत

2) पाकिस्तान

3) ऑस्ट्रेलिया

4) इंग्लंड

5) दक्षिण आफ्रिका

6) न्यूझीलंड

7) वेस्ट इंडीज

8) अफगाणिस्तान

9) श्रीलंका

10) बांगलादेश

पात्रता फेरीतून आलेले संघ :

1) आयर्लंड

2) नामिबिया

3) नेदरलँड्स

4) ओमान

5) पापुआ न्यू गिनी

6) स्कॉटलंड

गेल्या टी-20 विश्वचषकामध्ये वेस्ट इंडीजच्या संघाने उत्तम कामगिरी करत विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. ऑस्ट्रेलियात पार पडणाऱ्या टी-20 विश्वचषकात कोणता संघ बाजी मारेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच अफगाणिस्तानच्या संघाने क्रिकेट खेळात सहभाग घेऊन सर्वांचे मन जिंकली आहेत.