स्टिव्ह स्मिथ (Photo Credit: @ICC/Twiter)

इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघात अ‍ॅशेस (Ashes) मालिकेच्या पहिल्या टेस्ट सामन्याला काल, 1 ऑगस्टपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार टीम पेन (Tim Paine) याने पहिले फलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला. पण ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर अक्षरशः लोटांगण घातले. माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) आणि जलद गोलंदाज पीटर सिडल (Peter Siddle) याला वगळता अन्य खेळाडूंना त्यांना साजेशी खेळी करता आली नाही. मागील वर्षी दक्षिण आफ्रिका विरुद्ध चेंडूशी छेडछाड करण्याप्रकरणी दोषी आढल्यानंतर स्मिथ याच्यावर बंदी घालण्यात आली होती. आणि त्याने 16 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमध्ये धमाकेदार पुनरागमन केले. (Ashes 2019: विराट कोहली याला मागे टाकत डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर 24 टेस्ट शतक ठोकणारा स्टीव्ह स्मिथ दुसरा वेगवान फलंदाज)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून वर्षभर बाहेर राहिलेल्या स्मिथने अ‍ॅशेस टेस्टच्या पहिल्या डावात शतकी कामगिरी केली. स्मिथ आणि सिडल यांच्या भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला पहिल्या दिवसाखेर 284 धावा करता आल्या. आणि आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार माइकल क्लार्क (Michael Clarke ) याने एजबॅस्टन (Edgbaston) येथे सुरू असलेल्या टेस्टच्या दुसर्‍या दिवसाआधी एक भव्य भविष्यवाणी केली आहे. क्लार्कला वाटते की पहिल्या दिवशी स्मिथने चमक दाखवल्यानंतर दिवस हा नॅथन लायन (Nathan Lyon) याचा असेल. शिवाय क्लार्कने फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने केलेल्या पुनरागमनाबद्दल त्यांचे कौतुक केले. पहा हे ट्विटर पोस्ट:

दरम्यान, अ‍ॅशेस टेस्टच्या पहिल्या दिवशी बॉल टेम्परिंग बाबद दोषी असलेले ऑस्ट्रियाचिया त्रिमूर्ती- स्टिव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर (David Warner)आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट (Cameron Bancroft) यांनी ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅशेस मालिकेसाठी संघात स्थान मिळवले. पण तिघांना या टेस्टच्या पहिल्या दिवशी त्यांना प्रेक्षकांकडून अपेक्षित अशीच वागणूक मिळाली. चेंडूशी छेडछाड प्रकरणानंतर या तिघांना स्टेडियममध्ये डिवचण्याचा प्रयत्न केला गेला. वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट यांना सॅण्डपेपर दाखवण्यात आले तर स्मिथला चिडवण्यासाठी इंग्लंडच्या प्रेक्षकांनी स्मिथचे रडत असलेल्या चेहऱ्याचा फोटो असलेले मास्क लावले होते.