ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) याने इंग्लंड (England) विरुद्ध पहिल्या अॅशेस (Ashes) टेस्टच्या पहिल्या दिवशी धडाकेबाज फलंदाजी करत 16 महिन्यानंतर टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. ऑस्ट्रेलियाचा टेस्ट कर्णधार टीम पेन (Tim Paine) याने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण तो चुकीचा ठरला आणि यजमान इंग्लंड संघाच्या गोलंदाजांनी त्यांची गोची केली. स्मिथ फलंदाजीला आला तेव्हा ऑस्ट्रिची स्थिती 3 बाद आणि 35 धावा अशी होती. स्मिथने 144 धावांची तडाखेबाज शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. (Ashes 2019: डेविड वॉर्नर आऊट झाल्यावर चाहत्यांनी दाखवले Sandpaper, काढली जुन्या जखमांवरची खपली, पहा Video)
चेंडूशी छेडछाड प्रकरणानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या स्मिथला या सामन्यादरम्यान प्रेक्षकांकडून चिडवण्यात देखील आले पण स्मिथने या सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता शतकी खेळी केली. हे त्याचं हे टेस्ट क्रिकेटमधील 24 वं तर अॅशेसमधील 9 वं शतक आहे. याचबरोबर त्याने रन-मशीन विराट कोहली (Virat Kohli) याला मागे टाकलं आहे. विराटने 123 टेस्ट डावात 24 शतकं ठोकली होती तर स्मिथने केवळ 118 डावात 24 टेस्ट शतकं केली आहेत. पण, टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 24 शतकं करण्याचा विश्वविक्रम हा माजी ऑस्ट्रेलिया क्रिकेटपटू आणि महान फलंदाज दोन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. ब्रॅडमन यांनी फक्त 66 डावात 24 शतकं करण्याची कामगिरी केली होती.
स्मिथच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 284 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने 122 धावांत 8 विकेट गमावल्या होत्या. त्यावेळी स्मिथने पीटर सिडल याच्या साथीने डाव सावरला आणि ऑस्ट्रेलियाला 284 धावा करण्यास महत्वाचे योगदान केले. पहिल्या दिवसा अखेरीस इंग्लंड संघाने 10 धावा केल्या. दुसऱ्या दिवशी इंग्लंडचे रोरी बर्न्स (Rory Burns) आणि जेसन रॉय (Jason Roy) मैदानात उतरतील.