शारजाह येथे रविवारी आयपीएल (IPL) 2020 च्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) फलंदाज इशान किशनला (Ishan Kishan) माघारी पाठवण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) मनीष पांडेने (Manish Pandey) जबरदस्त डाइव्हिंग कॅचला पकडला. मनीषला आजच्या हैदराबादच्या सामन्यात सुरुवातील फिल्डिंग दरम्यान संघर्ष करावे लागले. संदीप शर्माच्या 15 व्या ओव्हरच्या एका चेंडूवर मनीषने हार्दिक पांड्याचा झेल सोडले जेणेकरून मुंबई इंडियन्सला चार धावा मिळाल्या, पण त्याच ओव्हरच्या नंतरच्या चेंडूवर इशांतने मोठा फटका मारला जो त्याच्या बॅटवर नीट बसला नाही आणि चेंडू सीमारेषेच्या आत पडत असताना मनीषने बाउंड्री लाईनवर जबरदस्त उडी मारली आणि कॅच पकडला. अशाप्रकारे मुंबईचा घातक फलंदाज किशन आज 31 धावा करून माघारी परतला. (MI vs SRH, IPL 2020: क्विंटन डी कॉकचे तुफान अर्धशतक, कीरोन पोलार्ड-हार्दिक पांड्याच्या 'पॉवर-हिटिंग'ने SRHसमोर 209 धावांचे आव्हान)
दरम्यान, मनीषचा हा कॅच पाहून सोशल मीडियावर चाहतेच नाही तर दिग्गज देखील प्रभावित झाले. सचिन तेंडुलकर, जीवन मेंडिस यांनी मनीषने घेतलेला कॅच पाहून अशा प्रतिक्रिया दिल्या. पाहा मनीषने घेतलेला सुपरमॅन कॅच...
What a catch by Manish Pandey💉 pic.twitter.com/pXBsWduSuq
— 🦇 (@115_Adelaide) October 4, 2020
सुपरमॅन-ईश
ICYMI - Catch marvel: SuperMan-ish 😱😱😱
He saw, he flew, he caught - Take a bow @im_manishpandey. That was a stunning catch. Right on the list of best so far in the tournament.
WATCH - https://t.co/byrZOMe9lX #Dream11IPL pic.twitter.com/c4B79TmXID
— IndianPremierLeague (@IPL) October 4, 2020
सचिन तेंडुलकर प्रभावित!!
What a catch by @im_manishpandey !
Tremendous athleticism...#MIvSRH #IPL2020
— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 4, 2020
अॅथलेटिक !!
What a catch from Manish Pandey. So athletic and brilliant!! #IPL2020 pic.twitter.com/kv8eIafXp1
— Riya (@reaadubey) October 4, 2020
जीवन मेंडिस
What a sensational catch by Manish Pandey! @im_manishpandey The fielding efforts in the @IPL is getting better and better.. Splendid cricket all round.. #Dream11IPL pic.twitter.com/zZauSm8I8h
— Jeevan Mendis (@jeevanmendis) October 4, 2020
मिम्स!!
Manish pandey after taking Ishan kishan's catch ~ pic.twitter.com/jdJpHrL6QG
— D🅾️R🅰️EⓂ️🅾️N 🇮🇳 (@Nobita_ka_baap) October 4, 2020
जबरदस्त
That's a stunner from Manish Pandey#MIvSRH #IPL2020 pic.twitter.com/LJWmnwQnRP
— R Ranjan (@TheRRanjan) October 4, 2020
सुपर कॅच !!
Super catch from Manish Pandey@im_manishpandey 💛❤️#IPL2020 #Dream11IPL #SRHvsMI pic.twitter.com/FEhwigWKtJ
— Sachin Patil (@ka33_unLtd) October 4, 2020
दरम्यान, आजच्या सामन्यात पहिले फलंदाजी करून 208 धावा केल्या आणि हैदराबादसमोर 209 धावांचे आव्हान दिले. क्विंटन डी कॉकने 67 धावा केल्या. ईशान किशन 31, सूर्यकुमार यादवने 27 धावा केल्या. कीरोन पोलार्ड आणि हार्दिक पांड्याच्या जोडीने मोठे फटके मारले आणि टीमला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. पोलार्ड 25 आणि कृणाल पांड्या 20 धावा करून नाबाद परतले. हार्दिक 28 धावा करून बाद झाला. आजच्या सामन्यासाठी मुंबईने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही तर हैदराबादने भुवनेश्वर कुमार आणि खालील अहमदच्या जागी अनुक्रमे संदीप शर्मा आणि सिद्धार्थ कौलला संधी दिली.