MI vs RR IPL 2021 Match 24: Quinton de Kock ची स्फोटक बॅटिंग, मुंबईची राजस्थानवर 7 विकेटने मात
क्विंटन डी कॉक (Photo Credit: PTI)

MI vs RR IPL 2021 Match 24: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आयपीएलच्या (IPL) 24व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर (Rajasthan Royals) 7 विकेटने मात करत स्पर्धेत तिसरा विजय नोंदवला. राजस्थानने दिलेल्या 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने 18.3 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून विजय मिळवला. मुंबईच्या विजयात क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) यांनी निर्णायक भूमिका बजावली. डी कॉकने 50 चेंडूत 140 च्या स्ट्राईक रेटने 6 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 70 धावा केल्या तर कृणालने 39 धावांचे योगदान दिले. किरोन पोलार्ड (Kieron Pollard) 16 धावा करून नाबाद परतला. याशिवाय मुंबईसाठी सूर्यकुमार यादवने 16 तर कर्णधार रोहित शर्माने 14 धावा केल्या. मुंबईचा सहा सामन्यांतील हा तिसरा विजय ठरला आहे. दुसरीकडे, राजस्थानसाठी क्रिस मॉरिसने 2 विकेट्स काढल्या तर मुस्तफिजूर रहमानला 1 विकेट मिळाली. (IPL 2021 Mid-Season Transfer: आयपीएलच्या ट्रांसफर विंडोद्वारे Mumbai Indians ‘या’ 3 खेळाडूंना करू शकतात टार्गेट, विरोधी संघावर पडू शकतात भारी)

राजस्थानने दिलेल्या तगड्या धावसंख्येच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात रोहित-डी कॉकच्या सलामी जोडीने संघाला सावध सुरुवात करून दिली. मुंबईला पॉवर-प्लेच्या शेवटच्या चेंडूवर मोठा धक्का बसला जेव्हा मॉरिसने हिटमॅन रोहितला 14 धावांवर चेतन साकरियाच्या हाती कॅच आऊट केलं.यानंतर मॉरिसने सूर्यकुमारला तंबूचा रस्ता दाखवला आणि मुंबईला दुसरा धक्का दिले. या दरम्यान डी कॉकने एक बाजू धरून 35 चेंडूत शानदार अर्धशतक झळकावले. डी कॉकने तिसऱ्या पांड्याच्या  अर्धशतकी भागीदारी करत संघाला विजयाच्या जवळ नेले. पण मोक्याच्या क्षणी मुस्तफिजूर रहमानने कृणालला त्रिफळा उडवला आणि त्याला पॅव्हिलियनमध्ये जाण्यास भाग पडले. अखेरीस डी कॉकने पोलार्डच्या साथीने मुंबईला तिसरा विजय मिळवून दिला.

यापूर्वी, राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक 42 धावांची खेळी केली. जोस बटलरने 41 धावा तसेच शिवम दुबेने 35 धावा आणि यशस्वी जयस्वलाने 32 धावांची खेळी केली. शिवाय, मुंबईकडून राहुल चाहरने 2 विकेट्स घेतल्या तर ट्रेंट बोल्ट व जसप्रीत बुमराहला 1 विकेट मिळाली.