MI vs RR IPL 2021: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात आज आयपीएलचा (IPL) 24वा सामना खेळला जाणार आहे. मुंबई-राजस्थान संघातील आजचा सामना दिल्लीच्या (Delhi) अरुण जेटली स्टेडियममध्ये (फिरोज शाह कोटला मैदान) खेळला जाईल. आजच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून राजस्थानला पहिले फलंदाजी करण्यास सांगितले आहे. मुंबईने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे तर राजस्थानच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल झालेला नाही आहे. मुंबईने त्यांचा स्टार युवा फलंदाज ईशान किशनला (Ishan Kishan) बाहेर केले असून त्याच्या जागी ऑस्ट्रेलियन नॅथन कोल्टर-नाईलचा (Nathan Coulter-Nile) समावेश केला आहे. मुंबईकडून आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करणे अपेक्षित होते कारण किशन मागील पाच सामन्यात प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला आहे. (IPL 2021: आयपीएल सीजन 14 च्या मध्यात Mumbai Indians ची साथ सोडून ‘हा’ धाडक खेळाडू विराटच्या RCB ताफ्यात झाला सामील)
आयपीएलमध्ये मुंबई आणि राजस्थान संघातील इतिहासाबद्दल बोलायचे तर दोन्ही संघ आजवर 22 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यापैकी दोघांनी प्रत्येकी 11 सामने जिंकले आहेत त्यामुळे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. शिवाय, यंदाच्या मोसमात मुंबईला 2 सामन्यात विजय तर 3 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. राजस्थानची स्थिती देखील मुंबईसारखीच आहे. राजस्थानचा पाचपैकी 2 सामन्यात विजय तर 3 सामन्यात पराभव झाला आहे त्यामुळे दोन्ही संघ आजच्या सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत वर जाण्याच्या प्रयत्नात असतील. आयपीएल गुणतालिकेत मुंबई चौथ्या तर राजस्थान सातव्या स्थानावर आहे.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, किरोन पोलार्ड, कृणाल पांड्या, जयंत यादव, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि नॅथन कोल्टर-नाईल.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन: संजू सॅमसन (कॅप्टन/विकेटकीपर), जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे, राहुल तेवतिया, डेविड मिलर, रियान पराग, क्रिस मॉरिस, जयदेव उनाडकट, चेतन सकारीया आणि मुस्तफिजुर रहमान.