IPL 2021: आयपीएल सीजन 14 च्या मध्यात Mumbai Indians ची साथ सोडून ‘हा’ धाडक खेळाडू विराटच्या RCB ताफ्यात झाला सामील
स्कॉट कुगेलेइजन (Photo Credit: Instagram)

Scott Kuggeleijn Joins RCB for IPL 2021: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज स्कॉट कुगलेइजनला (Scott Kuggeleijn) यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतलेल्या ऑस्ट्रेलियन केन रिचर्डसनच्या (Kane Richardson) जागी 2021 मोसमातील उर्वरित सामन्यांसाठी संघात सामील केले असल्याचे ईएसपीएन क्रिकइन्फोने आपल्या अहवालात म्हटले आहे. भारतात कोरोनाच्या घटना वाढत असताना तीन ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आयपीएल 2021 मधून माघार घेतली आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज स्कॉट कुगलेइजनला लिलावात कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते पण तो यंदाच्या मोसमासाठी मुंबई इंडियन्सचा राखीव गोलंदाज होता. आरसीबी संघातील अ‍ॅडम झांपा (Adam Zampa) आणि रिचर्डसन या दोघांनीही वैयक्तिक कारणांमुळे यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आरसीबीचे प्रशिक्षक सायमन कॅटिच (Simon Katich) यांनी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मागील सामन्यादरम्यान Scott Kuggeleijn चा संघात समावेश करण्याबाबत पुष्टीही केली. (IPL 2021: कोरोनाचे संकट! डेव्हिड वार्नर, स्टिव्ह स्मिथसह ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू आयपीएलमधून माघार घेण्याची शक्यता)

Kuggeleijn हा हा न्यूझीलंडचा रहिवासी असून 2019 मध्ये तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता. त्यावेळी लुंगी एनगीडीच्या जागी त्याची चेन्नई संघात निवड झाली होती. कुगलेइजनने आतापर्यन्त दोन आयपीएल सामने खेळले आहेत. शिवाय, आयपीएल 2021 च्या लिलावातही त्याला कोणताही खरेदीदार सापडला नाही. 50 लाख रुपये त्याची बेस प्राईस होती. स्कॉटच्या न्यूझीलंडसाठी आंतरराष्ट्रीय कामगिरी बाबत बोलायचे तर 29 वर्षीय स्कॉटने न्यूझीलंडकडून 16 टी-20 सामन्यात 13 विकेट्स घेत 79 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने दोन एकदिवसीय सामन्यात पाच गडी बाद केले आहेत. त्याच्या एकूण 120टी-20 सामन्यांत 118 विकेट्स घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत कुगलेइजनकडून यंदाच्या हंगामात आरसीबीला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. कुगलेइजनच्या आरसीबी संघात दाखल झाल्याने संघाच्या वेगवान हल्ल्याला अधिक संतुलन मिळेल जे यंदाच्या हंगामात पैसा-वसूल कामगिरी करत आहेत. हर्षल पटेलने पर्पल कॅप काबीज केली आहे तर मोहम्मद सिराज आणि काईल जेमीसन देखील संघात चांगले योगदान देत आहेत. दरम्यान, लेगस्पिनर झांपाच्या जागी बदली खेळाडूची अद्याप निवड झालेली नाही आहे.

दरम्यान, झांपा आणि रिचर्डसनला वगळता स्टीव्ह स्मिथ (दिल्ली कॅपिटल्स), डेविड वॉर्नर (सनरायझर्स हैदराबाद), क्रिस लिन (मुंबई इंडियन्स) आणि पॅट कमिन्स (कोलकाता नाईट रायडर्स) असे एकूण 14 ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अद्याप आयपीएलमध्ये खेळत आहेत.