मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स

कोरोना काळात युएई (UAE) येथे आयपीएल (IPL) क्रिकेट उत्सवाची आजपासून सुरुवात होईल. क्रिकेटप्रेमींची उत्सुकता आज अखेर संपणार आहे. इंडियन प्रीमिअर प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 13 व्या सत्राच्या पहिल्या सामन्यात गतजेता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि  उपविजेते चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आमने-सामने येतील. हा सामना अबू धाबी (Abu Dhabi) येथे खेळला जाईल. यासह कोरोना विषाणूमुळे भारताबाहेर युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलचे शुभारंभ होईल. पुढील 53 दिवसात रिकाम्या स्टेडियममध्ये जेव्हा आठ संघ भिडतील तेव्हा मैदानाबाहेरही संपूर्ण विश्वाचे लक्ष या स्पर्धेवर असणार आहे. या वेळी आयपीएलचे सर्व सामने युएईच्या तीन शहर-दुबई, अबू धाबी आणि शारजाह येथे खेळले जातील. सर्वाधिक 24 सामने दुबई, 20 सामने अबु धाबी आणि 12 सामने शारजाह येथे होतील. बायोसेफ्टी वातावरणात आतापर्यंत दोन द्विपक्षीय मालिका यशस्वीरित्या आयोजित करण्यात आल्या आहेत, परंतु आयपीएल ही सर्वात मोठी कसोटी असेल. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील मुंबई इंडियन्स आणि एमएस धोनीची (MS Dhoni) सीएसके (CSK) आयपीएलमधील दोन सर्वात यशस्वी टीम आहेत व यंदाही स्पर्धा जिंकण्यासाठी दावेदार असतील. (IPL 2020: कोण आहे मुंबई इंडियन्सचा सर्वात धोकादायक प्लेयर? दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने घेतले 'हे' नाव)

आयपीएल 2020 चा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात शनिवार, 19 सप्टेंबर रोजी अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर होणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल आणि टॉस सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी 7.00 वाजता होईल. भारतात प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. आपण या सामन्याचे थेट प्रवाह Disney+ Hotstar अ‍ॅपवर पाहू शकता. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात.

येथे पाहा दोन्ही संघ

मुंबई इंडियन्स टीम: रोहित शर्मा (कॅप्टन), दिग्विजय देशमुख, क्विंटन डी कॉक, आदित्य तारे, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, नॅथन कोल्टर-नाईल, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, सूर्यकुमार यादव, कुणाल पांड्या, कीरोन पोलार्ड, राहुल चाहर, क्रिस लिन, हार्दिक पांड्या, शेरफेन रदरफोर्ड, अनमोलप्रीत सिंह, मोहसिन खान, मिशेल मॅकक्लेनाघन, प्रिंस बलवंत राय सिंह, अनुकूल रॉय आणि इशान किशन.

सीएसके टीम: महेंद्र सिंह धोनी (कॅप्टन), अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चाहर, ड्वेन ब्रावो, फाफ डु प्लेसिस, इमरान ताहिर, एन जगदीशन, कर्ण शर्मा, केदार जाधव, लुंगी एनगीडी, मिशेल सॅटनर, मोनू कुमार, मुरली विजय, रविंद्र जडेजा, रुतुराज गायकवाड, शेन वॉटसन, शार्दुल ठाकुर, सॅम कुर्रान, पीयूष चावला, जोश हेजलवुड आणि आर साइ किशोर.