IND vs NZ: मयंक अग्रवाल याने न्यूझीलंड XI विरुद्ध सराव सामन्यात कपिल देव स्टाईलमध्ये मारला 'नटराज शॉट', पाहा Video
मयंक अग्रवाल (Photo Credit: Getty Images)

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) मध्ये शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेआधी सराव सामना खेळण्यात आला. हा सामना अनिर्णित राहिला असला तरी भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी दाखवून दिले की ते मालिकेसाठी सज्ज आहे. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहच्या शानदार गोलंदाजीनंतर सलामीवीर मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) ने दुसऱ्या डावात स्फोटक फलंदाजी केली. रोहित शर्माला दुखापत झाल्यावर मयंकला वनडेमध्ये सलामी फलंदाज म्हणून खेळण्याची संधी मिळाली. इथे तो काही कमाल करू शकला, पण आता टेस्टमधील त्याच्या आवडत्या स्वरूपात तो ठसा उमटवण्यास उत्सुक असेल. मयंकने या सराव सामन्यात माजी भारतीय कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांचा प्रसिद्ध 'नटराज शॉट' (Natraj Shot) खेळला. मयंकच्या या शॉटचे चाहत्यांनी खूप कौतुक केले. वनडे सामन्यात अपयशी डावानंतर मयंक टेस्ट मालिकेआधीच्या सराव सामन्यात लयीत आला आणि आपल्या अनोख्या शॉटने सर्वांना प्रभावित केले. (IND vs NZ Test: न्यूझीलंड XI विरुद्ध सराव सामन्यात सलग षटकार रिषभ पंत याने किवी संघाला दिली चेतावणी, पाहा Video)

मयंकच्या 'नटराज शॉट' चा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कपिल देवचा 'नटराज शॉट' खूप प्रसिद्ध आहे आणि आगामी '83' च्या चित्रपटात रणवीर सिंहही हा शॉट खेळताना दिसेल. मयंकने ड्रॉ राहिलेल्या सराव सामन्यात 81 धावांची खेळी करत न्यूझीलंड दौऱ्यावरील खराब फॉर्म संपुष्टात आणला. या डावाने मयंकचे मनोबल नक्की वाढले असेल. पाहा व्हिडिओ:

पहिल्या डावात भारताने 263 धावा तर न्यूझीलंडच्या इलेव्हन संघाने 235 धावा केल्या होत्या. सराव सामन्यात या खेळीपूर्वी अग्रवालने 8, 32, 29, 37, 24, 0, 0, 32, 3, 1, 1 धावा केल्या ज्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी मालिकेपूर्वी त्याचं आत्मविश्वासावर प्रश्न उपस्थित केले जात होते. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपचा एक भाग असल्याने मालिका जिंकून आणि अव्वल स्थान कायम ठेवून टीम इंडिया गुण वाढविण्याच्या प्रयत्न असेल.