ICC Men's T20 World Cup 2021: 'या' देशात टी-20 विश्वचषक होण्याची शक्यता, बीसीसीआय सचिव जय शाह यांचे मोठे वक्तव्य
BCCI Secretary Jay Shah and President Sourav Ganguly. (Photo Credits: ANI)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी टी -20 विश्वचषक (ICC Men's T20 World Cup 2021) संदर्भात मोठे विधान केले आहे. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले आहेत की, 'आपल्या देशातील कोविड-19 ची (Coronavirus) परिस्थिती लक्षात घेता आम्ही ही स्पर्धा युएईमध्ये (United Arab Emirates) हलवू शकतो. आम्ही परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवत आहोत. खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षा यांना अत्यंत महत्त्व आहे. यासंदर्भात लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

देशात कोरोना संसर्गामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय देशात आयसीसी टी-20 विश्वचषक सारख्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन करण्याचा मोठा धोका घेऊ शकत नाही. जरी बीसीसीआयने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला टी-20 विश्वचषक युएईमध्ये हलविण्याविषयी अधिकृतपणे काही सांगितले नाही. परंतु, देशातील सद्य परिस्थिती लक्षात घेता विश्वचषक युएईमध्ये होणार आहे, हे जवळजवळ निश्चित झाले आहे. हे देखील वाचा-

क्रिकेट वेबसाइट ईएसपीएन क्रिकइन्फोच्या म्हणण्यानुसार, आयपीएल 2021 आणि टी -20 विश्वचषकाचे उर्वरित दोन्ही सामने युएईमध्ये होऊ शकतात. आयपीएलचे उर्वरित सामने 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. त्यानंतर लगेच 17 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषक खेळला जाऊ शकतो.

टी-20 विश्वचषकाचा पहिला राऊंड 8 संघामध्ये दोन गटात खेळला जाणार आहे. यात 12 सामने खेळले जातील. यातील 4 संघ सुपर 12साठी क्वालिफाई करतील. यात बांग्लादेश, श्रीलंका, आयरलॅंड, स्कॉटलॅंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांचा समावेश आहे.