Shakib Al Hasan Banned: मशरफे मुर्तजा याने शेअर केली शाकिब अल हसन याच्यासाठी प्रेरानादयी पोस्ट, पाहा Tweet
मशरफे मुर्तजा, शाकिब अल हसन (Photo Credit: Getty)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बांग्लादेश टी-20 आणि टेस्ट संघाचा कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याच्यावर कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट खेळण्यापासून दोन वर्षांसाठी बंदी घातली आहे. आयसीसी (IPL) चा लाचलुचपत प्रतिबंधक कोड (Anti-Corruption Code) स्वीकारल्यानंतर एक वर्षाच्या बंदीला दोन वर्षापर्यंत करण्यात अली आहे. आयसीसीने कलम 2.4.4 अंतर्गत शाकिबवर बंदी घातली आहे. आयपीएलसह तीन वेळा संशयित भारतीय सट्टेबाज ऑफर केल्याची माहिती न पुरवल्याबद्दल शाकिबवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (ICC) दोन वर्षांसाठी बंदी घातली आहे. संघाच्या भारत दौऱ्याआधी ही कारवाई करण्यात आल्याने बांग्लादेशला मोठा धक्का बसला आहे. निलंबनाचा अर्थ असा आहे की ऑस्ट्रेलियामध्ये होणार्‍या 2002 च्या टी-20 विश्वचषक आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघासाठी इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये तो भाग घेऊ शकणार नाही. 29 ऑक्टोबर 2020 ला शाकिब क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल. (शाकिब अल हसन याचे कथित भारतीय बुकीसह WhatsApp चॅट उघडकीस, IPL 2018 मध्ये फिक्सिंगची दिली होती ऑफर)

या दरम्यान, क्रिकेट विश्वात मोठ्या प्रमाणात प्रगती झाल्याने 2019 च्या विश्वचषकात बांग्ला टायगर्सचे नेतृत्व करणारा मशरफे मुर्तझा (Mashrafe Mortaza) निराश झाला आहे. मशरफे तीन महिन्यांहून अधिक काळ क्रिकेटमधून बाहेर आहे आणि त्याच्या परत येण्याची तारीख अद्याप कळू शकली नाही. 36 वर्षीय मशरफेने सोशल मीडियावर शाकिबसह दोन फोटो शेअर करारात भावनिक पोस्ट शेअर केली. तो निराश झाला असला तरीही, शाकिबच्या नेतृत्वात बांगलादेश 2023 च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात खेळेल असा विश्वासही त्याने दर्शवला. मशरफेने फोटो शेअर करत बंगाली भाषेत एक मेसेज लिहिला. "13 वर्षे एकत्र खेळल्यानंतर, मी आपल्या योद्धाच्या निलंबनानंतर काही रात्री निश्चितपणे निद्रिस्त होईल. पण काही दिवसांनी, 2023 विश्वचषक फायनल खेळू, असा विचार करून, मला चांगली झोप येईल. कारण नाव आहेशाकिब अल हसन.”

शाकिब हा बांगलादेशचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आहे. त्याने तीनही क्रिकेटच्या स्वरूपात 11,000 हून अधिक धावा आणि 500 हून अधिक विकेट्सची नोंद केली आहे. आयसीसीच्या या कारवाईमुळे भारत दौऱ्यापूर्वी बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. अनुभवी फलंदाज तमीम इक्बाल याने या दौऱ्यातून माघार घेतली आहे. दुखापतीमुळे सैफुद्दीन याने यापूर्वीच दौऱ्यातून माघार घेतली होती.