IPL 2021 पूर्वी संघांसाठी धोक्याची घंटा! SRH कर्णधार डेविड वॉर्नरचा ट्रेलर, घरगुती स्पर्धेत ठोकले वादळी शतक
डेविड वॉर्नर (Photo Credit: Instagram/cricketcomau)

IPL 2021: ऑस्ट्रेलियाचा स्फोटक ओपनर डेविड वॉर्नर (David Warner) आगामी इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14व्या हंगामापूर्वी लयीत परतला आहे. मार्श कपमध्ये न्यू साउथ वेल्सकडून (New South Wales) खेळताना वॉर्नरने तस्मानिया (Tasmania) संघाविरुद्ध शानदार शतक झळकावले. आयपीएल (IPL) संघ सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) कर्णधार वॉर्नरने सामन्यात 108 धावांचा जोरदार डाव खेळला. वॉर्नरच्या या खेळीच्या जोरावर न्यू साउथ वेल्सने तस्मानिया संघाला तीन विकेटने पराभूत केले. या विजयासह न्यू साउथ वेल्सने मार्श कपच्या गुणतालिकेत चार सामन्यांत 3 विजयासह पहिले स्थान मिळवले आहे. वॉर्नरच्या खेळीत 10 आश्चर्यक चौकार लगावले. वॉर्नरने आतापर्यंत स्पर्धेत अनुक्रमे 87, 24, 69 आणि 108 धावा केल्या आहेत आणि सातत्यपूर्ण खेळीमुळे टी-20 स्पर्धेपूर्वी त्याचा आत्मविश्वास वाढवेल. वॉर्नरच्या लयीत परतणे सनरायझर्ससाठी दिलासा देणारे आहे आणि फ्रेंचायझीने देखील वॉर्नरच्या शतकी खेळीला सलाम केले आहे. वॉर्नरच्या नेतृत्वात संघाने 2016 मध्ये पहिल्यांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. (22 वर्षीय गोलंदाज हरीशंकर रेड्डी महेंद्रसिंह धोनीची विकेट घेतो तेव्हा, Watch Viral Video)

यापूर्वी, ऑस्ट्रेलियन सलामी फलंदाजाने कसोटी मालिकेतही भारताविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. त्यामध्ये त्याने, 83, 69 आणि 48 धावा केल्या. वॉर्नर सनरायझर्स हैदराबादच्या यशाची गुरुकिल्ली आहे. संघासाठी कर्णधार आणि ओपनर म्हणून कामगिरी करणाऱ्या वॉर्नरने आजवर फ्रँचायझीसाठी उत्कृष्ट कामगिरी असून, त्याने ऑरेंज आर्मीचे पुढाकाराने नेतृत्व केले आहे. वॉर्नरने मागील सत्रात 548 धावा केल्या होत्या ज्यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश होता. 2019 आणि 2018 मध्ये त्याने अनुक्रमे 692 आणि 641 धावा केल्या.एकूणच आयपीएलमध्ये 5,000 धावा पूर्ण करणाऱ्या पाच फलंदाजांपैकी एक आहे. विशेष म्हणजे वॉर्नर आयपीएलच्या इतिहासात तीन ऑरेंज कॅप जिंकणारा एकमेव खेळाडू आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by cricket.com.au (@cricketcomau)

चांगली बातमी म्हणजे की त्याचे ओपनर जोनी बेअरस्टो आणि रिद्धिमान साहाने गेल्या दोन-तीन हंगामात चांगली कामगिरी केली होती. वॉर्नर, साहा/बेअरस्टो, केन विल्यमसन आणि मनीष पांडे यांच्यासह आघाडीच्या मजबूत फळीनंतर संघाला मधल्या फळीत चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. दरम्यान, संघाची मधली फळी मजबूत करण्यासाठी संघाने मागील महिन्यात झालेल्या लिलावात केदार जाधवचा समावेश केला. सामना जिंकवण्यासाठी केदारला अब्दुल समद आणि अभिषेक शर्मासारख्या युवांची पूरक साथ गरजेची आहे.