MPL 2023 (Photo Credit - Twitter)

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या महाराष्ट्र प्रिमियर लीग (MPL 2023) स्पर्धा 15 जूनपासून सुरु होत आहे. काही दिवसापूर्वी या लीगसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी या सहा संघामध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. 15 जूनपासून सुरु होणाऱ्या स्पर्धेचा 29 जून रोजी समारोप होणार आहे. हे सर्व सामने पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडिअम, गहुंजे येथे (MCA Cricket Stadium, Pune) खेळले जातील. एमपीएल स्पर्धेत एकूण 19 सामने खेळले जाणार आहेत. त्यातील 15 साखळी सामने, तर उर्वरित 4 प्ले-ऑफचे सामने असतील. या स्पर्धेत प्रत्येक संघ प्रत्येकी 5 सामने खेळणार आहे. याव्यतिरिक्त स्पर्धेत महिला क्रिकेटचे तीन प्रदर्शनीय सामनेही खेळवले जाणार आहेत. पुणेरी बप्पा आणि कोल्हापूर टस्कर्स यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. त्याआधी ओपनिंग सरेमनिचा कार्यक्रम रंगणार आहे. अमृता खानविलकर हिच्यासह अन्य कलाकार परफॉर्म करणार आहेत.

कधी आणि कुठे पाहणार सामना

दरम्यान, क्रिकेटप्रेमीना मोबाईल ॲप वरून महाराष्ट्र प्रिमियर लीग सामन्याचा आनंद घेता येणार आहे. फॅनकोड या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग करणार आहे. तसेच सामन्याचे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्टस या वाहिनीवर करण्यात येईल! डिश टीव्ही चॅनल नं. 640, एअरटेल चॅनल नं. 298, व्हिडिओकॉन चॅनल नं. 646, टाटा स्काय चॅनल नं. 453 आणि सन डायरेक्ट चॅनल नं. 302 या चॅनलवर तुम्ही सामने पाहु शकतात. (हे देखील वाचा: BCCI ने घेतला मोठा निर्णय, अर्जुन तेंडुलकरसह 'या' 20 तरुणांना NCA मध्ये प्रशिक्षण मिळणार, पहा यादी)

पहा संपुर्ण वेळापत्रक

  • 15 जून 2023 –

सांयकाळी 08 वाजता – पुणेरी बाप्पा vs कोल्हापूर टस्कर्स

  • 16 जून 2023 –

दुपारी 02 वाजता – इगल नाशिक टायटन्स vs छत्रपती संभाजी किंग्स

सांयकाळी 08 वाजता – रत्नागिरी जेट्स vs सोलापूर रॉयल्स

  • 17 जून 2023 –

सांयकाळी 08 वाजता – कोल्हापूर टस्कर्स vs रत्नागिरी जेट्स

  • 18 जून 2023 –

दुपारी 02 वाजता – इगल नाशिक टायट्नस vs सोलापूर रॉयल्स

सांयकाळी 08 वाजता – पुणेरी बाप्पा vs छत्रपती संभाजी किंग्स

  • 19 जून 2023

सांयकाळी 08 वाजता – पुणेरी बाप्पा vs इगल नाशिक टायट्नस

  • 20 जून 2023 –

दुपारी 02 वाजता – सोलापूर रॉयल्स vs कोल्हापूर टस्कर्स

सांयकाळी 08 वाजता – रत्नागिरी जेट्स vs छत्रपती संभाजी किंग्स

  • 21 जून 2023 –

सांयकाळी 08 वाजता – इगल नाशिक टायट्नस vs रत्नागिरी जेट्स

  • 22 जून 2023 –

दुपारी 02 वाजता – छत्रपती संभाजी किंग्स vs कोल्हापूर टस्कर्स

सांयकाळी 08 वाजता – पुणेरी बाप्पा vs सोलापूर रॉयल्स

  • 23 जून 2023 –

सांयकाळी 08 वाजता – सोलापूर रॉयल्स vs छत्रपती संभाजी किंग्स

  • 24 जून 2023

दुपारी 02 वाजता – पुणेरी बाप्पा vs रत्नागिरी जेट्स

सांयकाळी 08 वाजता – कोल्हापूर टस्कर्स vs इगल नाशिक टायट्नस

सांयकाळी 08 वाजता – 25 जून 2023 – क्वालिफायर 1

सांयकाळी 08 वाजता – 26 जून 2023 – एलिमेनर

सांयकाळी 08 वाजता – 27 जून 2023 – क्वालिफायर 2

सांयकाळी 08 वाजता – 29 जून 2023 – फायनल