Lankan Premier League 2020: 'तुझ्या जन्मापूर्वी पासून मी आंतरराष्ट्रीय शतक करतोय', शाहिद आफ्रिदी व 21 वर्षीय अफगान गोलंदाजांत झाला यांच्यात शाब्दिक वाद (Watch Video)
शाहिद आफ्रिदी आणि नवीन उल-हक वाद (Photo Credit: Twitter)

Lankan Premmier League 2020: पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला (Shahid Afridi) वाद निर्माण करणारा खेळाडू म्हणून ओळखला जातो. शाहिद सध्या लंकन प्रीमियर लीगमध्ये (Lankan Premier League) खेळत आहे आणि येथे तो एका सामन्यानंतर अफगाणिस्तानच्या (Afghanistan) युवा गोलंदाजाशी भिडला. 21 वर्षीय नवीन-उल-हकला (Naveen-ul-Haq) शाहिदने चर्चे दरम्यान आपला दर्जा दाखवला आणि झापून काढलं. सोमवार, 30 नोव्हेंबर रोजी कॅंडी टस्कर्स (Kandy Tuskars) आणि गाले ग्लॅडिएटर्स (Galle Gladiators) दरम्यान झालेल्या सामन्यात हा प्रकार घडला. या सामन्यात टस्कर्स संघाने 25 धावांनी विजय मिळवला. तथापि, टस्कर्सचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक आणि ग्लॅडिएटर्सची जोडी मोहम्मद अमीर (Mohammad Amir) व आफ्रिदी यांच्यातील वादाने चुरशीचे वातावरण निर्माण केले. सोशल मीडियावर सध्या यांच्यातील वादाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. 18व्या ओव्हरमध्ये या वादाला सुरुवात झाली जेव्हां आमिरने नवीनच्या चेंडूवर चौकार खेचला. ओव्हर संपल्यावर नवीनने आमिरसाठी काही अपशब्द वापरले त्यानंतर दोघे मैदानावरच आमने-सामने आले. (Lanka Premier League 2020: आंद्रे रसेलची तुफान खेळी, लंकन प्रीमियर लीग सामन्यात ठोकले तिसरे वेगवान टी-20 अर्धशतक)

अन्य सहकाऱ्यांनी मध्यस्ती करत वाद तात्पुरता मिटवला, पण 20व्या ओव्हरमध्ये आमिरने नवीनच्या चेंडूवर षटकार मारला आणि रागाने पाहत काहीतरी म्हणाला. सहकाऱ्यांनी पुहा वाद शांत केला, पण मॅच संपल्यावर हात मिळवणी करताना नवीन समोर येताच आफ्रिदीचा पारा चढला आणि त्याने 21 वर्षीय अफगान गोलंदाजांची क्लास घेतली. आफ्रिदी नक्की काय म्हणाला हे अद्याप स्पष्ट नाही, पण पाकिस्तानी पत्रकार साज सादिकच्या ट्विटर पोस्ट नुसार आफ्रिदी म्हणाला, "बाळा, तू जन्मालाही नव्हता तेव्हापासून मी आंतरराष्ट्रीय शतक मारतोय." पाहा दोन्ही खेळाडूंमधील विवादाचे हे व्हिडिओ:

साज सादिक

दरम्यान, टस्कर्सने ग्लॅडिएटर्सला 25 धावांनी पराभूत करून स्पर्धेतील पहिला विजय नोंदविला. टस्कर्सने पहिले फलंदाजी करत ग्लॅडिएटर्सपुढे 197 धावांचे आव्हान ठेवले. ग्लॅडिएटर्सचा सलामीवीर दानुष्का गुणथिलाकाने 53 चेंडूत 82 धावांची खेळी केली, पण संघाला विजय मिळवून देण्यास ती पुरेशी ठरली नाही आणि त्यांना निर्धारित ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 171 धावांपर्यंतच मजल मारता आली.