Lowest Score in Test Cricket: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) अॅडिलेड ओव्हलमधील (Adelaide Oval) पहिल्या पिंक-बॉल कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 244 धावा करणारा भारतीय संघ (Indian Team) दुसऱ्या डावात 9 बाद 36 धावांवर कोसळला. मोहम्मद शमीच्या हाताला पॅट कमिन्सचा चेंडू लागल्याने भारताने आपला डाव घोषित केला. दुसऱ्या दिवसाखेर 60 धावांची आघाडी घेतलेल्या भारताला तिसऱ्या दिवशीच्या रात्रीच्या जेवणापर्यंत 30 अधिक धावाच करता आल्या, त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाला (Team India) अपमानास्पद स्थितीला सामोरे जावे लागले. 'विराटसेने'च्या नावावर आता भारताच्या सर्वात निच्चांकी कसोटी धावसंख्येच्या (India Lowest Test Total) लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. यापूर्वी, इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्समध्ये 1974 मध्ये भारताने तिसऱ्या डावात अवघ्या 42 धावा केल्या होत्या. भारताने तिसऱ्या दिवशी 1 बाद 9 धावांवर खेळण्यास सुरुवात केली मात्र पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि जोश हेझलवूडच्या (Josh Hazlewood) जोडीने पहिल्या सत्रात 30 धावांवर 8 विकेट घेतल्या. (IND vs AUS 1st Test 2020: पिंक-बॉल टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजयीरथ सुरूच, अॅडिलेड कसोटीत Aussie संघाची 'विराटसेने'वर मात)
दिवसाच्या सुरुवातीला जसप्रीत बुमराह, पुजारा, रहाणे, मयंक आणि कोहलीला एकामागोमाग एक माघारी धाडत कांगारूंनी भारताला बॅकफूटला ढकललं. लाजिरवाणं म्हणजे आजच्या सामन्यात एकही भारतीय फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही तर मयंक अग्रवालने सर्वाधिक 9 आणि हनुमा विहारीने 8 धावा केल्या. भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आजवर असं पहिल्यांदाच घडलं आहे. कांगारू संघाकडून हेझलवूडने 5 तर कमिन्सने 4 विकेट घेतल्या आणि भारताची हाराकिरी केली. शिवाय, भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्ध देखील ही सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडने 1995 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी 26 धावसंख्येची नोंद केली आहे.
A day to remember for Australia as they bowled India out for their lowest total in Test history 😯
Have you seen a more clinical bowling performance?#AUSvIND pic.twitter.com/FOmSNKfYbm
— ICC (@ICC) December 19, 2020
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने जो बर्न्सच्या दुसऱ्या डावातील अर्धशतकाच्या जोरावर 2 विकेट गमावून भारतावर मात केली आणि पिंक-बॉल कसोटीतील आपला रेकॉर्ड कायम ठेवला. ऑस्ट्रेलियाने आजवर आठ दिवस/रात्र टेस्ट सामने खेळले असून सर्व मॅचमध्ये एकतर्फी विजय मिळवला आहे. यासह ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारतासाठी हा एक कठीण दिवस होता - त्यांच्या बाजूने काहीही गेले नाही. पहिल्या डावात आघाडी घेण्यापासून ते आतापर्यंत सर्वात कमी कसोटी धावांवर बाद होण्यापर्यंत, विराट कोहली आणि टीमसाठी आजचा दिवस वाईट ठरला.