IPL 2023 Prize Money: इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या (IPL 2023) मोसमाचा अंतिम सामना 28 मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (Chennai Super Kings vs Gujarat Titans) यांच्यात होणार आहे. आयपीएलच्या या मोसमातील दुसरा क्वालिफायर सामना शुक्रवारी गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (Gujarat Titans and Mumbai Indians) यांच्यात खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला गेला. क्वालिफायर 2 मध्ये, गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 62 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. दरम्यान, अंतिम विजेत्या संघावर पैशांचा पाऊस होणार आहे. तसेच यंदाच्या मौसमात कुणाल किती रक्कम मिळणार आहे जाणून घ्या...
तसेच जगातील सर्वात मोठी आणि महागडी लीग इंडियन प्रीमियर लीग 2008 मध्ये सुरू होऊन 16 वर्षे झाली आहेत. सुरुवातीच्या हंगामात चॅम्पियन संघाला 4 कोटी 80 लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले होते. याशिवाय उपविजेत्या संघाला 2.4 कोटी रुपये देण्यात आले. पण आता काळाच्या ओघात ही बक्षीस रक्कम खूप वाढली आहे. (हे देखील वाचा: LSG vs MI, IPL 2023 Eliminator Stats And Record Preview: लखनौ आणि मुंबई यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना, आजच्या सामन्यात होऊ शकतात हे मोठे विक्रम; पहा येथे आकडेवारी)
आयपीएलच्या बक्षीस रकमेत पाचपट वाढ
2008 पासून आयपीएलच्या बक्षीस रकमेत पाच पटीने वाढ झाली आहे. आयपीएल 2023 चे विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला 20 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. तर अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जाणाऱ्या संघाला 13 कोटी रुपये मिळणार आहेत. मात्र, यावेळी प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या अन्य दोन संघांना 7-7 कोटी रुपये मिळतील.
शीर्षक विजेता संघ - 20 कोटी रुपये
अंतिम पराभूत संघ - 13 कोटी रुपये
प्लेऑफमध्ये पोहोचलेले दोन्ही संघ – 7-7 कोटी रुपये
याशिवाय आयपीएलमध्ये केवळ संघच नाही तर खेळाडूंनाही अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. या पुरस्कारांमध्ये बक्षीस रकमेचा समावेश आहे.
ऑरेंज कॅप - 15 लाख रुपये
पर्पल कॅप - 15 लाख रुपये
मॉस्ट वैलुएबल खेळाडू - 12 लाख रुपये
सर्वाधिक षटकार - 12 लाख रुपये
सुपर स्ट्रायकर - 15 लाख रुपये
पाॅवर प्लेअर - 12 लाख रुपये
गेम चेंजर -12 लाख
इमजिंग प्लेअर -20 लाख
कॅच आफ द सिजन - 12 लाख
सामनावीर (फायनल) - 15 लाख