टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) सध्या लॉकडाउनचा (Lockdown) पूर्ण फायदा करून घेत आहे. भारतात लॉकडाउन केल्या पासून धोनी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. त्याची पत्नी साक्षीने या लॉकडाउन दरम्यान फोटो आणि व्हिडिओज शेअर करून धोनीबद्दल त्याच्या चाहत्यांना नियमितपणे माहिती देत आहे. धोनीची आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) सोशल मीडिया अकाउंट ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यात 'कॅप्टन कूल' आपली मुलगी जिवाबरोबर (Ziva) रांचीमध्ये दर्जेदार वेळ घालवताना दिसत आहे. धोनी आणि जिवाचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धोनीने 2019 वर्ल्ड कपनंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. अशा स्थितीत त्याच्या निवृत्तीबाबत अनेक अफवा समोर आल्या आहेत. मात्र, धोनीने अद्याप याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. कोरोना व्हायरसमुळे आयपीएल पुढे ढकलण्यात आल्याने धोनीच्या भविष्याविषयी बरीच अटकळ बांधली जात आहे. (Lockdown: यजुवेंद्र चहल याला सतावतेय एमएस धोनी याची आठवण; अदृश्य होण्याची शक्ती प्राप्त झाल्यास रांचीला जाण्याची इच्छा (Watch Video))
पण, या सर्वांपासून दूर धोनी नवीन व्हिडिओमध्ये आपल्या रांची फार्म हाऊसच्या बागेत आपली मुलगी जिवा आणि कुत्र्यासोबत कॅचचा सराव करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये धोनी जिवाला कुत्र्याला कशाप्रकारे प्रशिक्षण द्यायचे याबाबत धडे देत आहे. जिवाकडे एक बॉल आहे, जो ती वारंवार बाऊन्स करते आणि डॉग त्याला कॅच करतो. धोनी आपल्या कुत्र्याकडून बऱ्याच अपेक्षेने चेंडू आकाशात उंच उडवतो. साक्षी धोनीला चेंडू थोडा खाली ठेवण्यास सांगितले असता जिवाने तिच्या वडिलांना जबरदस्त प्रत्युत्तर दिले. "मी तुमच्यापेक्षा चांगलं टाकू शकते," झीवा म्हणाली. पाहा हा व्हिडिओ:
#Thala @msdhoni's back...quite literally so! 😊 #WhistlePodu VC: @SaakshiSRawat pic.twitter.com/UmZmb9A9uf
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 5, 2020
धोनी सोशल मीडियावर अधिक सक्रिय नसतो, त्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याच्या बाबत अधिक माहिती मिळत नाही. पण, साक्षी सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव आहे आणि बर्याचदा धोनी आणि जीवाचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करते. साक्षीच्या पोस्टवरून चाहत्यांना धोनीबद्दल अपडेट्स मिळत असतात. यापूर्वी साक्षीने रांची येथील फार्महाऊसमध्ये बाईक चालविणार्या धोनी आणि जिवाची व्हिडिओ क्लिप शेअर केली होती.