कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संसर्गामुळे लॉकडाउन देशभरात 40 दिवसांपेक्षा जास्त दिवस सुरू आहे. या लॉकडाउनमुळे बरेच लोकं कुटुंबापासून दूर दुसऱ्या ठिकाणी राहावे लागत आहे. देशात कोणालाही आवश्यकता नसल्यास घरा बाहेर जाण्याची परवानगी नाही, या दरम्यान टीम इंडियाचा युवा लेगस्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याला माजी कर्णधार आणि टीम इंडियाचा सहकारी विकेटकीपर एमएस धोनी (MS Dhoni) याची आठवण सतावत आहे. यापूर्वी चहलने सोशल मीडियावर धोनीबाबत एक भावुक पोस्ट शेअर केली. धोनी मागील अनेक महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. टीव्ही प्रस्तुतकर्ता यशिका गुप्ताबरोबर नुकत्याच झालेल्या इन्स्टाग्राम लाईव्ह चॅट दरम्यान धोनीचा सहकारी चहलने माजी कर्णधारांबद्दल भाष्य केले. माजी कर्णधाराशी चांगला संबंध असलेल्या युझीने लॉकडाउन संपल्यावर त्याला भेटण्याची इच्छा असल्याचे उघड केले. (युजवेंद्र चहल याने ने सुचवले नवीन नियम, ICC ला बालपणीचा 'हा' मजेदार नियम लागू करण्याचा दिला प्रस्ताव)
चहलला अदृश्य होण्याचा मार्ग सापडला तर आपण काय करणार असे विचारले असताना भारतीय फिरकीपटू म्हणाला की, "मी थेट रांचीला जाईन- माही भाईला भेटण्यासाठी." यानंतर, यशिका म्हणाली की सीएसकेचा कर्णधार अलीकडच्या काळात लोकांच्या नजरेतून अदृश्य झाला आहे. तिने असेही म्हटले आहे की धोनीने कधीही इन्स्टाग्राम लाइव्ह कधीच केलेला नाही आणि फक्त चहलच त्याला हे काम करायला लावू शकतो. यावर प्रतिक्रिया देताना चहल म्हणाला की, हवाई उड्डाण पुन्हा सुरू होताच तो माजी भारतीय कर्णधाराला भेट देईल आणि तेव्हा तो त्याच्या चाहत्यांसाठी आपला इंस्टाग्राम चोवीस तास खुला ठेवेल.
View this post on Instagram
धोनी सोशल मीडियावर अधिक सक्रिय नसणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. अलीकडेच, त्याची पत्नी साक्षी सिंहच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे तो रांची येथील फार्महाऊसमध्ये क्वारंटाइन वेळ घालवत असल्याचे समजले होते. आयपीएल 2020 मधून धोनी क्रिकेट च्या मैदानावर पुनरागमन करणार होता, पण स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्याने धोनीचं कमबॅक लांबणीवर गेले आहे.