पूर्व दिल्लीचे खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी केजरीवाल (Kejriwal) सरकारच्या लॉकडाउन (Lockdown) 4.0 मध्ये बाजारपेठ, वाहतूक सेवा पुनर्संचयित करण्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्य सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचनांमध्ये दिल्लीकरांना बऱ्याच सवलती मिळाल्या आहेत. लॉकडाउन 3 नंतर आता लॉकडाउन 4 लागू केले आहे जो 31 मे पर्यंत सुरू राहील. दरम्यान, प्रत्येक राज्य सरकारने आपापल्या राज्यात कमीत-कमी सवलत देत आहेत, दिल्लीचे (Delhi) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनीही सोमवारी दिल्लीकरांना लॉकडाउन चारबाबत मार्गदर्शक सूचना जारी केली. केजरीवाल यांनी दिल्लीत बस, टॅक्सी, टॅक्सी, ऑटो, ई-रिक्षा, खाजगी आणि सरकारी कार्यालये अटीसह उघडण्यास परवानगी दिली. मात्र, पूर्व सरकारचे भाजप खासदार गौतम गंभीर याने दिल्ली सरकारच्या या निर्णयावर टीका केली. गंभीरने केजरीवाल सरकारच्या या निर्णयाचे डेथ वॉरंट म्हणून वर्णन केले आहे. (Coronavirus Update in India: भारतात कोरोना बाधितांची संख्या 1 लाखाच्या पार, गेल्या 24 तासांत 4970 नवे रुग्ण)
त्याने ट्विट केले की, “जवळजवळ सर्व काही एकत्रितपणे उघडण्याचा निर्णय दिल्लीकरांसाठी डेथ वॉरंट प्रमाणे आहे. मी दिल्ली सरकारला पुन्हा पुन्हा विचार करण्याची विनंती करतो! एक चुकीचे पाऊल आणि सर्व काही संपेल.'' दिल्ली सरकारच्या आदेशानुसार बाजारपेठ व बाजार संकुलात ऑडी-इव्हनच्या आधारे दुकाने उघडली जातील. हा नियम पाळण्याची पूर्ण जबाबदारी बाजार संघटना, प्रशासन व उप कामगार आयुक्तांची असेल. यासह असे म्हटले आहे की औद्योगिक प्रतिष्ठानमध्ये वेगवेगळ्या वेळी कामाची वेळ असेल जेणेकरून सर्व एकत्र न येवोत, न जावोत. पाहा गंभीरचे ट्विट:
The decision to open up almost everything in one go can act as a DEATH WARRANT for Delhiites!
I urge Delhi Govt to think again & again! One wrong move & everything will be over!! #DelhiLockdown
— Gautam Gambhir (@GautamGambhir) May 18, 2020
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी सांगितले की राज्यातील मेट्रो, शाळा, महाविद्यालये, कोचिंग संस्था, जलतरण तलाव, सिनेमा हॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, जिम, इंटरनेट पार्क, बार, थिएटर, सभागृह आणि परिसंवाद हॉल बंद राहतील. यासह ते म्हणाले की सध्या राज्यात सलून आणि स्पा देखील बंद राहतील. धार्मिक कार्यक्रम आणि राजकीय कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही. गर्दी जमण्यास परवानगी नाही. भारतात कोरोना ग्रस्तांची संख्या 1 लाखांच्या पार गेली असून दिल्लीत एकूण 10,054 रुग्ण सक्रिय आहेत.