भारतात कोरोना (Coronavirus) रुग्णांची सध्याची आकडेवारी पाहता देशातील स्थिती चिंताजनक झाली आहे. देशात कोरोना संक्रमितांच्या संख्येने 1,00,000 चा टप्पा पार केला असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 1,01,139 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत देशात 4970 नवे रुग्ण आढळले असून 134 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात सद्य स्थितीत मृतांची एकूण संख्या 3163 वर पोहोचली असून 58,802 रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच 39,174 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
भारतात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेता देशात 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला असून लॉकडाऊन 4.0 सुरु झाला आहे. अशा स्थितीत या विषाणूला आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. Lockdown 4 Guidelines: केंद्र सरकारने जाहीर केले लॉक डाऊन 4 चे नियम; जाणून घ्या 31 मे पर्यंत Night Curfew सह कोणत्या गोष्टी सुरु असतील व काय असेल बंद, See Full List
COVID19 cases cross 1 lakh mark with a single-day jump of 4970 cases & 134 deaths; total cases 101139 & death toll 3163: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/i16FULqLjn
— ANI (@ANI) May 19, 2020
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.
लॉकडाऊनच्या 4 थ्या टप्प्यात सर्व झोनमध्ये अत्यावश्यक सेवा पुरवणारे लोक सोडून, इतर सर्वांवर संध्याकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत बाहेर जाण्यावर बंदी असणार आहे. या टप्प्यामध्ये सरकारने रात्र कर्फ्यू लावला आहे.