गतवर्षी ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध घरच्या मैदानावर पाच वनडे सामन्यांची मालिका 2-3 ने गमावणाऱ्या भारतीय संघाला (Indian Team) सध्या सुरु असलेल्या मालिकेच्या पहिल्या सामान्यता 10 विकेटने लज्जास्पद पराभवाला सामोरे जावे लागेल तर, राजकोटमधील दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाने अष्टपैलू कामगिरी करत विजयाची नोंद केली आणि 3 सामन्यांच्या मालिकेत बरोबरी केली. आता मालिकेच्या विजयाचा निर्णय आज बेंगळुरू (Bengaluru) मध्ये होईल. राजकोट सामन्यात ऑस्ट्रेलियाला दिलेल्या 341 धावांच्या प्रत्युत्तरात भारताने 34 धावांनी विजय मिळविला पण या विजयापूर्वी भारताचे दोन्ही सलामी फलंदाज जखमी झाले, जी अखेरच्या सामन्याआधी यजमान संघासाठी चिंतेची बाब आहे. फलंदाजी करताना शिखरच्या बारगड्यांना पॅट कमिन्सचा चेंडू लागला, तर तर रोहितला क्षेत्ररक्षण करताना हाताला दुखापत झाली. बेंगळुरूमधील अखेरचा सामना जिंकण्यासाठी भारताचे दोन्ही सलामी फलंदाज संघात असणे आवश्यक आहे परंतु त्यांच्या खेळाविषयी अंतिम निर्णय सामन्यापूर्वी घेण्यात येईल. (IND vs AUS 2nd ODI: मनीष पांडे याने डेविड वॉर्नर ला बाद करण्यासाठी पकडलेला एक हाती सुपरमॅन स्टाईल कॅच पाहून सर्वांनाच बसला धक्का, पाहा हा Video)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेचा तिसरा वनडे सामना दुपारी दीड वाजता बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सुरू होईल. नाणेफेक दुपारी एक वाजता होईल. भारतीय चाहत्यांसाठी सामन्याचा लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर, तर लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग हॉटस्टारवर उपलब्ध असेल.
दुसर्या सामन्यात भारताने त्यांच्या फलंदाजीचे मिश्रण थांबविले आणि केएल राहुल याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत संधीचा पुरेपूर फायदा उठविला. रोहित आणि धवनने डावाची सुरुवात केली, तर कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. दरम्यान, तिसऱ्या सामन्यासाठी संघात कोणताही बदल संभवत नाही. दुसरीकडे, पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या प्लेयिंग इलेव्हनमधेही फारसा बदल होण्याची शक्यता नाही. ऑस्ट्रेलियासाठी स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लाबूशेन यांनी चांगली फलंदाजी केली. वॉर्नर आणि कर्णधार आरोन फिंच आऊट झाल्यावर स्मिथ आणि लाबूशेनच्या जोडीने डाव सांभाळला. मात्र, संघाला विजय मिळवून देण्यासाठी ते पुरेसे नव्हते.
असा आहे भारत-ऑस्ट्रेलिया वनडे संघ
भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (विकेटकीपर), केदार जाधव, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, नवदीप सैनी, आणि युजवेंद्र चहल.
ऑस्ट्रेलिया: आरोन फिंच (कॅप्टन), डेविड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), डार्सी शॉर्ट, अॅश्टन टर्नर, जोश हेजलवुड, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, केन रिचर्डसन, अॅडम झँपा, अॅस्टन अगार, पीटर हैंडस्कोम्ब.