'गौतम गंभीर फलंदाज म्हणून आवडतो, पण त्याच्या व्यक्तिमत्वात थोडी समस्या', शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला (Watch Video)
गौतम गंभीर-शाहिद आफ्रिदी (Photo Credit: Getty)

2007 मध्ये कानपूर येथे भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात झालेल्या वनडे सामन्यानंतर भारताचा माजी सलामी फलंदाज गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि पाकिस्तानचा माजी अष्टपैलू व कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) यांच्यातील संबंध कटू झाले आहेत. या सामन्यादरम्यान दोन्ही खेळाडूंमध्ये वाद झाला ज्याच्या कडू आठवणी अजूनही दोघांच्याही मनात ताज्या आहेत. या सामन्यानंतर दोन्ही खेळाडूंनी एकमेकांवर बरीच विधाने केली आहेत. आता आफ्रिदीने गंभीरवर विधान करत पुन्हा एकदा या आगीला हवा दिली आहे. गंभीरविषयी बोलताना आफ्रिदी म्हणाला की या माणसाबरोबर काही समस्या आहेत. आफ्रिदीने म्हटले की, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर त्याला फलंदाज म्हणून नेहमीच आवडला परंतु माणूस म्हणून तो त्याला चांगला मानत नाही. जैनब अब्बास (Zainab Abbas) यांना दिलेल्या मुलाखतीत आफ्रिदी म्हणाला की, “एक क्रिकेटर म्हणून, फलंदाज म्हणून मला तो नेहमीच आवडला, परंतु माणूस म्हणून त्याच्याशी काही समस्या आहेत.” (ENG vs PAK 2020: इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान टीमला शाहिद आफ्रिदी फाउंडेशनचा सहारा, वाचा काय आहे प्रकरण)

आफ्रिदी म्हणाला की, "बर्‍याच वेळा तो असे काही बोलतो किंवा वागतो की त्याला असे वाटते की राहू दे, त्याच्याबरोबर काही समस्या आहेत. त्याच्या फिजिओने याबद्दल आधीच सांगितले आहे."  पॅडी अप्टनने (Paddy Upton) त्यांच्या पुस्तकात गौतम गंभीरवर दिलेल्या विधानाचा संदर्भ देत पाकिस्तानचा माजी कर्णधार आफ्रिदी बोलत होता. उपटनने 2009 ते 2011 दरम्यान भारतीय संघात मानसिक कंडीशनर म्हणून काम केले. त्यांनी म्हटले होते की 100 धावा केल्यावरही तो खूप दुःखी होता आणि त्याचा जोर त्याच्या चुकांवर होता. उपटनने आपल्या पुस्तकात लिहिले की, “मानसिक सामर्थ्याच्या कल्पनेखाली मी ज्या लोकांसोबत काम केले त्यांच्यापैकी गंभीर एक कमकुवत आणि मानसिकदृष्ट्या सर्वात असुरक्षित होता.”

यावर गंभीरने प्रतिक्रिया देत म्हटले होते की, “मी स्वत: आणि भारतीय संघ जगातील सर्वोत्कृष्ट असावा असे मला वाटत होते. म्हणूनच पॅडी यांच्या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे 100 धावा केल्यावरही मी समाधानी नसायचो. मला तिथे काहीही चुकीचे दिसत नाही.” दरम्यान, काही महिन्यांपूर्वी आफ्रिदीने काश्मीरबाबत विवादास्पद भाष्य केले तेव्हा गंभीरसह त्याचा जोरदार वाद झाला होता.