शाहिद आफ्रिदी (Photo Credit: Getty)

ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात 3 टेस्ट आणि 3 टी-20 मालिकेसाठी पाकिस्तानी संघ (Pakistan Team) इंग्लंडमध्ये (England) दाखल झाला आहे. पण, कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी बोर्डाला प्रायोजक मिळाले नाही. बोर्डाचा जुन्या प्रायोजकांशी करारही संपला आहे. तथापि, स्पॉन्सर न मिळाल्याने आता पाकिस्तानी टीमवर इंग्लंड दौऱ्यावर लोगो शिवाय खेळण्याची नामुष्की ओढावली आहे. पण, त्यांना माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा (Shahid Afridi) सहारा मिळाला आहे. आफ्रिदीने याबाबत तशी घोषणाही केली आहे. Pepsi कंपनीशी करार संपल्याने पाकिस्तानी बोर्डाला नवीन प्रायोजक शोधण्यासाठी संघर्ष करावा लागला. पण आता त्यांच्या प्ले किटवर शाहिद आफ्रिदी फाउंडेशनचा (Shahid Afridi Faundation) लोगो असेल. त्याच्या फाउंडेशनचा लोगो पाकिस्तानी खेळाडूंच्या शर्टवर लावला जाईल अशी माहिती खुद्द आफ्रिदी यांनी दिली. (Coronavirus: पाकिस्तान बोर्डला कोरोना व्हायरसचा फटका, नवीन स्पॉन्सर मिळत नसल्यामुळे PCB समोर आर्थिक संकट)

आफ्रिदी यांनी ट्विट केले की, “शहीद आफ्रिदी फाऊंडेशनचा लोगो पाकिस्तानच्या प्ले किटवर छापला जाईल याबद्दल आम्हाला आनंद आहे, कारण आम्ही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चॅरिटी पार्टनर आहोत.वसीम खान यांचे आभार आणि पीसीबीच्या सतत सहकार्याबद्दल धन्यवाद.आमच्या संघाला इंग्लंड दौर्‍यावर नाबाद राहण्याची शुभेच्छा.” तथापि, शाहिद आफ्रिदी फाउंडेशनचा लोगो फक्त इंग्लंड मालिकेसाठी असेल.

क्रिकेट पाकिस्तानच्या एका अहवालानुसार नुकत्याच झालेल्या प्रायोजकतेसाठी पीसीबीने निविदा प्रक्रियेदरम्यान केवळ एका कंपनीने रस दर्शविला. कंपनीने या कराराचे मूल्य मागील कराराच्या तुलनेत केवळ 30 टक्क्यांनी वाढवले आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील सलामीचा कसोटी सामना 5 ते 9 ऑगस्ट दरम्यान मॅनचेस्टर, ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळला जाणार आहे, त्यानंतर 13 ते 17 ऑगस्ट आणि 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान एजस बाऊल, साऊथॅम्प्टन येथे सलग दोन कसोटी सामने खेळले जातील. त्यानंतर तीन टी-20 सामन्यांसाठी पाकिस्तान पुन्हा मँचेस्टरला येईल. ओल्ड ट्रॅफर्ड येथे अनुक्रमे 1 सप्टेंबर, 28 आणि 30 ऑगस्ट रोजी खेळतील.