Sachin Tendulkar (PC - Twitter)

महाराष्ट्र सरकारचे माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांनी ते दिग्गज क्रिकेटपटू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांना कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचे म्हटले आहे. बच्चू कडू म्हणाले की, सचिन तेंडुलकरला पाठवण्यात येणारी ही नोटीस ऑनलाइन गेमिंग अॅप्ससंदर्भात आहे. सचिन तेंडुलकर ऑनलाइन गेमिंग अॅप्सला समर्थन देत असल्याचे कडू यांचे म्हणणे आहे.

यापूर्वी देखील बच्चू कडू यांनी एक आवाहन केले होते, ज्यात त्यांनी सचिन तेंडुलकरने ‘भारतरत्न’ (भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार) म्हणून अशा जाहिरातींमध्ये भाग घेऊ नये किंवा सट्टेबाजीला प्रोत्साहन देऊ नये असे म्हटले होते.

आता बच्चू कडू म्हणाले की त्यांनी सचिन तेंडुलकरला पेटीएम फर्स्ट गेमच्या प्रचार मोहिमेतून माघार घेण्याच्या त्यांच्या आवाहनाला उत्तर देण्यासाठी यापूर्वी वेळ दिला होता. मात्र, या विषयावर तेंडूलकरकडून कोणतेही उत्तर न आल्याने आपल्याला कायदेशीर नोटीस पाठवणे भाग पडले आहे.

पेटीएम फर्स्ट गेम नावाचा गेमिंग प्रोग्राम ऑनलाइन उपलब्ध आहे. हा ऑनलाइन गेम खेळून रिअल रोख रक्कम जिंकण्याची परवानगी देते. पेटीएम फर्स्ट गेम हा एक काल्पनिक गेम अॅप आहे. सध्या बाजारात MPL, Dream11, आणि WinZO, असे इतरही आणेल गेम अॅप्स आहेत. यापूर्वी ट्विटरवर जारी केलेल्या निवेदनात बच्चू कडू यांनी बॅटिंग मास्टर सचिन तेंडुलकरने पेटीएम फर्स्ट गेमची जाहिरात केल्याबद्दल त्यावर आक्षेप घेतला होता. (हेही वाचा: WhatsApp HD Quality Videos: आता व्हॉट्सअॅपवर एका क्लिकवर पाठवू शकता एचडी गुणवत्तेत व्हिडिओ; जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस)

ते म्हणाले होते की, ‘सचिन तेंडुलकर हा भारतरत्न आहे. त्याचे जगभरात असंख्य चाहते आहे. एका भारतरत्न असलेल्या व्यक्तीने पेटीएम फर्स्ट सारख्या जुगार अॅपची जाहिरात करणे योग्य नाही. मी महाराष्ट्र सरकार आणि सचिन तेंडुलकर यांना विनंती करतो की कृपया या जाहिरातीवर त्वरित बंदी घालावी.’