लता मंगेशकर आणि सचिन तेंडूलकर (Photo Credits-Facebook)

भारताची गानकोकिळा म्हणून ओखळल्या जाणाऱ्या लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा आज 90 वाढदिवस साजरा केला जात आहे. याच दिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी लता मंगेशकर यांना विविध क्षेत्रातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) यांने सुद्धा लता मंगेशकर यांना एका अनोख्या प्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत. सचिन याने त्याच्या ट्वीटरवरुन एक व्हिडिओ पोस्ट केल्या असून त्यात लतादीदींना वाढदिवसाचा आनंद व्यक्त केला आहे.

सचिन याने ट्वीटरवर व्हिडिओ पोस्ट करत असे म्हटले आहे की, लता मंगेशकर दीदी तुम्हाला 90 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. देव तुम्हाला उत्तम आरोग्य आणि सर्व आनंद देवो अशी इच्छा सचिन याने व्हिडिओतून व्यक्त केली आहे. तसेच सचिन याने व्हिडिओ पोस्ट लतादीदींना टॅग केली आहे.

सचिन तेंडूलकर ट्वीट: 

तसेच सचिन याने व्हिडिओच्या माध्यमातून संदेश देत त्यांच्या सोबतचा अनुभव सुद्धा आठवला आहे. लहानपणी मी माझ्या आईच्या कुशीत जास्तवेळ घालवत असे. त्यावेळी लतादीदींची गाणी ऐकायला मला खुप आवडायचे असे सचिनने म्हटले आहे. तर लतादीदी तुमचे पहिले गाणे मी कधी ऐकले हे नक्की आठवत नाही पण खरच ऐकले होते.(लता मंगेशकर यांचा आज 90 व्या जन्मदिनी 'Daughter of the Nation' पदवीने भारत सरकार करणार गौरव)

त्याचसोबत लतादीदींच्या गाण्यांचा फार मोठा मी चाहता असल्याचे सचिन याने म्हटले आहे. असा एकही दिवस नाही त्या दिवशी मी लतादीदींचे गाणे ऐकलेच नाही. त्याचसोबत सचिनच्या एका सुवर्णक्षणी लतादीदींनी 'तू जहां... तू जहां... चलेगा, मेरा साया साथ होगा' हे गाणे गायले असल्याचे ही सचिनने सांगितले आहे.