लता मंगेशकर यांचा आज 90 व्या जन्मदिनी 'Daughter of the Nation' पदवीने भारत सरकार करणार गौरव
Lata Mangeshkar (Photo credits: Wikimedia Commons/ Bollywood Hungama)

Happy 90th Birthday Lata Mangeshkar:  भारताची गानकोकीळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar)  आज (28 सप्टेंबर) 90 वा वाढदिवस साजरा करत आहे. यंदा मोदी सरकार लता मंगेशकर यांच्या 90 व्या वाढदिवसाचं औचित्य साधून 'Daughter of the Nation' ही पदवी बहाल करणार आहेत. ही पदवी म्हणजे लता मंगेशकर यांच्या गायनसेनेचा गौरव आहे. 13 व्या वर्षापासून गायन क्षेत्रात असलेल्या लता मंगेशकरंनी आपल्या मधूर आवाजाने जगाला भूरळ पाडली आहे. मागील 7 दशकं लता मंगेशकर यांनी मराठी, हिंदी यांच्यासह 36 भारतीय भाषांमध्ये गायन केले आहे. आज त्यांंच्या शिरपेचात 'डॉटर ऑफ नेशन' चा तुरा खोवला जाणार आहे.   ...असे पडले लता मंगेशकर हे नाव !

कवी आणि गीतकार प्रसून जोशी यांनी या सोहळ्यानिमित्त खास गाणं बनवलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लता मंगेशकर यांच्या आवाजाचे चाहते आहेत. काही महिन्यांपूर्वी भारत सरकारकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद, तत्कालीन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी लता मंगेशकर यांची 'प्रभुकुंज' येथील त्यांच्या राहत्या घरी सदिच्छा भेट घेतली होती.

भारत सरकार कडून लता मंगेशकर यांना यापूर्वी 2001 साली 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार मिळवणार्‍या त्य पहिल्या भारतीय महिला कलाकार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर लता मंगेशकर हे नाव 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स' मध्येही दाखल करण्यात आले आहे. 1974 ते 1991 यादरम्यान सर्वात जास्त गाण्यांचे रेकॉर्डिंग केल्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

लता मंगेशकर यांना गायनाचे बाळकडू त्यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून मिळाले आहे. मात्र दीनानाथांच्या अकाली निधनानंतर चार भावडं आणि कुटुंबाची जबाबदारी लता मंगेशकर यांच्यावर पडली. पहिली मंगळागौर या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी प्रथम पार्श्वगायन केले आणि हळूहळू त्यांनी मराठी, बंगाली, हिंदी सिनेमा जगतात त्यांच्या आवाजाने खास नाव मिळवलं.