किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यातील आयपीएलचा (IPL) सहावा सामना तोड्याच वेळात दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर थोड्याच वेळात सुरु होईल. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एकीकडे बेंगलोरने आयपीएलच्या (IPL) पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून स्पर्धेची विजयी सुरुवात केली आणि आपली विजयी लय कायम ठेवू पाहिलं, तर पंजाबला पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सुपर-ओव्हर सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे, मागचा पराभव विसरून पंजाब पहिला विजय मिळवू पाहत असेल. (How to Download Hotstar & Watch KXIP vs RCB Live: किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील मॅच पाहण्यासाठी कसं डाउनलोड कराल हॉटस्टार?)
पंजाबने आजच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल झाले आहेत. क्रिस गेलला यंदाही पंजाबने अंतिम-11 मध्ये सामील केले केले. पंजाबने मुरुगन अश्विन आणि जिमी नीशमला स्थान दिले आहेत. केएल राहुल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल फलंदाजीची जबाबदारी सांभाळतील. पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतरही मयंकचा 89 धावांचा डाव संघासाठी खूप सकारात्मक सिद्ध झाला. आजच्या सामन्यात हे आघाडीच्या फळीतील फलंदाजही मोठी खेळी खेळतील अशी अपेक्षा आहे. मोहम्मद शमी पुन्हा एकदा पंजाबचा मुख्य गोलंदाज असेल. दुसरीकडे, बेंगलोरने आजच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये मागील सामन्यापासून बदल केलेला नाही. बेंगलोरकडून आरोन फिंच आणि देवदत्त पड्डीकल पुन्हा एकदा डावाची सुरुवात करतील. आपला पहिला आयपीएल सामना खेळणाऱ्या पड्डीकलने चांगले प्रभावित केले होते. आणि आज देखील युवा फलंदाज आपला फॉर्म कायम ठेवू पाहिलं.
पाहा किंग्स इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा प्लेइंग इलेव्हन:
किंग्स इलेव्हन पंजाब: केएल राहुल (कॅप्टन/विकेटकीपर), मयंक अग्रवाल, करून नायर, निकोलस पूरन, सरफराज खान, ग्लेन मॅक्सवेल, जिमी नीशम, मोहम्मद शमी, शेल्टन कॉटरेल, मुरुगन अश्विन आणि रवि बिश्नोई.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: विराट कोहली (कॅप्टन), आरोन फिंच, देवदत्त पड्डीकल, एबी डिव्हिलियर्स, जोश फिलिप, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, डेल स्टेन, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल आणि उमेश यादव.