रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: PTI)

How to Download Hotstar To Watch KXIP vs RCB Live: किंग्स इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात आज इंडियन प्रीमिअर लीगच्या 13 व्या हंगामातील 6व्या सामन्यात टक्कर होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आजचा सामना खेळला जाईल. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आयपीएल यंदा युएईमध्ये आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे, लाखो चाहत्यांना आयपीएलचे सामने यंदा त्यांच्या घरी बसूनच पाहावे लागत आहेत. पण टीव्ही व्यतिरिक्त देखील चाहते ऑनलाईन आयपीएलचा आनंद घेऊ शकतात आणि त्याचा एक उत्तम पर्याय म्हणजे-हॉटस्टार (Hotstar). लाईव्ह टीव्ही, बातम्या, खेळाचे सामने पाहणाऱ्यांमध्ये हॉटस्टार एक प्रसिद्ध अ‍ॅप आहे. Disney+ Hotstar यंदा आयपीएलचे स्ट्रीम पार्टनर आहेत. आणि जर आपण हॉटस्टार आपल्या Android मोबाइल किंवा iOS मध्ये डाउनलोड केले नसेल तर आत्ताच डाउनलोड करून आपण पंजाब आणि बेंगलोर यांच्यातील आयपीएलचा सामना पाहू शकता.

मोबाईलमध्ये Diseny+ Hotstar डाउनलोड करून इन्स्टॉल करणे अगदी सोप्पे आहे. आजचा आयपीएलचा सामना लाईव्ह पाहण्यासाठी अँड्रॉइड यूजर्ससाठी हॉटस्टार अ‍ॅप गुगल प्ले-स्टोअरवर उपलब्ध आहे, तर Apple यूजर्ससाठी हे अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. हॉटस्टार आपण पहिले गुगल प्ले-स्टोअरद्वारे आणि दुसरे वेब ब्राउझरमधील हॉटस्टार एपीकेद्वारे डाउनलोड करू शकता.

1. हॉटस्टार डाउनलोड करणे खूप सोपे आहे. आपल्या प्ले स्टोअर वर जा आणि हॉटस्टार शोधा.

2. मग इन्स्टॉल पर्यायवर जाऊन क्लिक करा आणि आपल्या फोनमध्ये अ‍ॅप इन्स्टॉल करा.

3. आता, आपल्या अ‍ॅप्लिकेशन मेनूमध्ये किंवा होम स्क्रीनवर आपल्याला एक हॉटस्टार अ‍ॅपचे चिन्ह दिसेल.

4. आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटने साइन इन करुन अ‍ॅप उघडू शकता किंवा आवश्यक तपशील प्रदान करून साइन अप करू शकता.

5. आता आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा स्पर्धा जसे की आयपीएल, टीव्ही शो, चित्रपट आणि बरेच काही पाहू शकता.

हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामिळ, पंजाबी अशा बर्‍याच भाषांमध्ये हॉटस्टार उपलब्ध आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपट यासह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतचे व्हिडिओ कन्टेन्ट उपलब्ध आहेत.