कुलदीप यादव (Photo Credit: Twitter)

भारत (India)-न्यूझीलंडमधील (New Zealand) 5 सामन्यांच्या टी -20 मालिकेतील दुसरा सामना ऑकलंडच्या (Auckland) ईडन पार्क मैदानावर खेळला जात होता, तेव्हा सामन्यात गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) कॅमेरामॅन बनलेला दिसला. ऑकलँडच्या छोट्या मैदानावरील सामन्यात कर्णधार विराट कोहलीने कुलदीपला भारताच्या प्लेयिंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले. त्यानंतर त्याने चेंडु शिवाय कॅमेरा हातात घेतला. या चायनामनने न्यूझीलंडच्या डावा दरम्यान भाष्यकाराची भूमिकाही बजावली. युजवेंद्र चहल याच्या ओव्हरदरम्यान कुलदीपने हातात कॅमेरा पकडला आणि भारतीय संघाच्या (Indian Team) गोलंदाजीची विश्लेषणही केले. कुलदीपला पहिल्या दोन्ही सामन्यासाठी भारतीय संघातील प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर ठेवण्यात आले होते. (Video: ऑकलंड टी-20 सामन्यात शार्दुल ठाकूर आणि कॉलिन मुनरो यांची खेळपट्टीवर झाली टक्कर, किवी फलंदाजाच्या Rugby कौशल्याचे Twitter वर कौतुक)

जेव्हा कुलदीपला खेळातून बाहेर ठेवले जाते, तेव्हा तो एखाद्या कॅमेरामॅनकडे जातो आणि त्याचा कॅमेरा विचारतो आणि स्वतः चालवितो. न्यूझीलंडविरुद्ध सामन्यापूर्वीही तो दोनदा कॅमेरा पकडून दिसला आहे. कुलदीपच्या या कौशल्यावर यूजर्सही मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. एक यूजर म्हणाला की तो रवींद्र जडेजाला बघून गोलंदाजी शिकत आहे, तर दुसरा यूजर म्हणाला की कुलदीप नवीन नोकरी शोधत आहे. पाहा कुलदीपच्या फोटो वर नेटकाऱ्याची प्रतिक्रिया:

नवीन नोकरी शोधत आहे

गोलंदाजी शिकतोय

कुलदीपला नवीन नोकरी मिळाली!

पार्ट टाईम जॉब ???

अष्टपैलू बनण्याच्या तयारीत

न्यूझीलंडने पहिले फलंदाजी करत दिलेले 133 धावांचे लक्ष्य भारताने 17.3 ओव्हरमधेच पूर्ण केले. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. न्यूझीलंडविरुद्ध 7 विकेटने विजय मिळवल्यावर भारताने आता मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. आणि आता तिसरा निर्णायक सामना 29 जानेवारी रोजी हॅमिल्टनमध्ये खेळला जाईल.