
DC vs KKR TATA IPL 2025 48th Match: टाटा आयपीएल 2025 (IPL 2025) चा 48 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. दिल्लीने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. त्यांनी 9 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी 6 जिंकले आहेत आणि 3 गमावले आहेत. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्ससाठी आजचा सामना 'करो या मरो' असणा आहे आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 3 विजय, 5 पराभव आणि एक सामना अनिर्णीत राहिला. त्यामुळे आजचा सामना रोमांचक होणार आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाताने दिल्लीसमोर 205 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
A sensational last over from Mitchell Starc keeps KKR under 210 👏#DCvKKR LIVE: https://t.co/yFC6tQeTaz pic.twitter.com/uZRZWJtSFG
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 29, 2025
प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने निर्धारित 20 षटकांत चार गडी गमावून 204 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सडून कर्णधार अंगकृष रघुवंशीने 44 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, त्याने 32 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकार मारले. त्याच्या व्यतिरिक्त, रिंकू 36 धावांचे योगदान दिले.
दुसरीकडे, वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क दिल्ली कॅपिटल्स संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. दिल्ली कॅपिटल्सकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाला 20 षटकांत 205 धावा कराव्या लागतील. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेत दोन गुण मिळवायचे आहेत.