PC-X

Kolkata Knight Riders Cricket Team vs Royal Challengers Bengaluru Cricket Team: कोलकाता नाईट रायडर्स क्रिकेट टीम (केकेआर) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू क्रिकेट टीम (आरसीबी) इंडियन प्रीमियर लीग 2025 चा पहिला सामना 22 मार्च (शनिवार) रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे खेळला जाईल. पण खरा थरार काही छोट्या लढायांमध्ये दिसून येईल, ज्याचा परिणाम संपूर्ण सामन्याच्या निकालावर होऊ शकतो.

आयपीएल 2025 चा पहिला सामना असल्याने हा सामना खूपच रोमांचक असणार आहे. अनेक स्टार खेळाडूंमधील छोट्या लढती संपूर्ण सामन्याचा निकाल ठरवू शकतात. ईडन गार्डन्सची खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल असू शकते, ज्यामुळे केकेआरला थोडीशी आघाडी मिळू शकते, परंतु आरसीबीची मजबूत फलंदाजी कोणत्याही परिस्थितीत संघाला जिंकण्यास मदत करू शकते.

वरुण चक्रवर्ती विरुद्ध फिल सॉल्ट

कोलकात्याचा स्टार फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि आरसीबीचा आक्रमक फलंदाज फिल साल्ट यांच्यातील लढाई पाहण्यासारखी असेल. चक्रवर्ती त्याच्या फिरकीसाठी ओळखला जातो. दुसरीकडे, फिल सॉल्ट आक्रमक शैलीत खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि त्याच्याकडे फिरकीपटूंविरुद्ध मोठे फटके मारण्याची क्षमता आहे.

जोश हेझलवूड विरुद्ध क्विंटन डी कॉक

ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड त्याच्या अचूक लाईन आणि लेंथने कोणत्याही फलंदाजाला हादरवू शकतो. दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक सलामीवीर क्विंटन डी कॉक वेगवान गोलंदाजांविरुद्ध आक्रमकपणे खेळण्यासाठी ओळखला जातो. हेझलवूडची स्विंग गोलंदाजी आणि डी कॉकची आक्रमक फलंदाजी यांच्यातील ही टक्कर हा सामना आणखी रंजक बनवेल.

हर्षित राणा विरुद्ध विराट कोहली

केकेआरने तरुण वेगवान गोलंदाज हर्षित राणाला त्यांच्या गोलंदाजी हल्ल्याचा प्रमुख भाग बनवले आहे. दुसरीकडे, विराट कोहलीसारखा महान फलंदाज आहे. हर्षित त्याच्या वेग आणि स्विंगने कोहलीला अडचणीत आणू शकतो. परंतु कोहलीकडे भरपूर अनुभव आहे आणि तो कोणत्याही गोलंदाजाविरुद्ध मोठी खेळी खेळण्यास सक्षम आहे.

भुवनेश्वर कुमार विरुद्ध वेंकटेश अय्यर

आरसीबीचा अनुभवी स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि केकेआरचा स्फोटक फलंदाज वेंकटेश अय्यर यांच्यातील लढत देखील खूप महत्त्वाची असेल. भुवनेश्वरकडे त्याच्या स्विंग गोलंदाजीने सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट घेण्याची क्षमता आहे. तर व्यंकटेश अय्यर कोणत्याही गोलंदाजाविरुद्ध जलद खेळी खेळण्यात माहीर आहे.