Asia Cup 2023: बुधवारपासुन सुरू होणाऱ्या आशिया चषक (Asia Cup 2023) स्पर्धेत, भारतीय संघाला 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध (IND vs PAK) पहिला सामना खेळायचा आहे. या सामन्यात दोन्ही संघ विजयासाठी कसोशीने प्रयत्न करतील. जेव्हा जेव्हा पाकिस्तानविरुद्ध सामना असतो तेव्हा टीम इंडियाला विराट कोहलीची (Virat Kohli) आठवण येते ज्याचा या संघाविरुद्धचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. या सामन्यात कोहलीने शतक झळकावले तर तो एक मोठा विक्रम करेल. (हे देखील वाचा: Team India Arrived in Colombo: आशिया चषकासाठी श्रीलंकेत पोहचला भारतीय संघ, 2 सप्टेंबरला पाकिस्तानसोबत भिडणार (Watch Video)
क्रिकेटच्या देवाचा हा विक्रम कोहली मोडणार?
चेस मास्टर विराट कोहलीने आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 265 डावांमध्ये 57.32 च्या प्रभावी सरासरीने 12,898 धावा केल्या आहेत. जर त्याने आशिया कपमध्ये 102 धावा केल्या तर तो या फॉरमॅटमध्ये 13,000 धावा करणारा पाचवा आणि सर्वात वेगवान खेळाडू ठरेल. एकदिवसीय क्रिकेटमध्ये हा आकडा गाठण्याचा सर्वात जलद विक्रम सध्या सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, ज्याने 321 डावांमध्ये हा पराक्रम केला. अशा स्थितीत सचिनचा विक्रम मोडण्यासाठी विराटला 55 डावात केवळ 102 धावांची गरज आहे.
वनडेत 13 हजार धावा करणारे खेळाडू
सचिन तेंडुलकर - 321 डाव
रिकी पाँटिंग - 341 डाव
कुमार संगकारा - 363 डाव
सनथ जयसूर्या - 416 डाव
कोहलीच्या नावावर अनेक विक्रम
भारतीय चाहत्यांना विराट कोहलीने केवळ आशिया चषकातच नव्हे तर टूर्नामेंटच्या पहिल्या सामन्यात 2 सप्टेंबर रोजी कँडी येथे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध मोठे शतक झळकावून तेंडुलकरचा विक्रम मोडताना पाहण्यास आवडेल. दिल्लीत जन्मलेल्या या खेळाडूने एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद 8000, 9000, 10,000, 11,000 आणि 12,000 धावा करण्याचा विक्रम केला आहे.