भारत आणि इंग्लड दरम्यान धर्मशाला कसोटी सामना सात मार्चपासून सुरु होणार आहे. धर्मशाला कसोटी (Dharamshala Test) सामन्यात केएल राहुल (KL Rahul) खेळण्याची शक्यता कमीच आहे. कारण केएल राहुल उपचारासाठी (KL Rahul Injury) लंडनला रवाना झाला आहे. चौथ्या सामन्यापूर्वी (India vs England) बीसीसीआयनं केएल राहुल 90 टक्के तंदुरुस्त (KL Rahul Injury) असल्याचं सांगितलं होतं. पण आता तो उपचारासाठी लंडनला रवाना झाल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला ऊत आला आहे. (हेही वाचा - Shreyas Iyer Comeback In Ranji Trophy: रोहितच्या वॉर्निंगनंतर श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय)
पाहा पोस्ट -
🚨KL Rahul's availability for the final Test in Dharamsala is in doubt
🚨Jasprit Bumrah is likely to return to the squad for the final Test although discussions are still on regarding workload management of players pic.twitter.com/1s0ruI9zLR
— Goldsbet (@Goldsbetvip) February 28, 2024
राजकोट कसोटी सामन्यापूर्वी केएल राहुल 90 टक्के तंदुरुस्त असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण राहुल पूर्णपणे तंदुरुस्त नाही. अशा स्थितीमध्ये बीसीसीआय आणि एनसीए याचं रिव्यू करणार आहे. केएल राहुल याला लंडना तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी पाठवण्यात आले आहे. जवळपास एक आठवड्यापासून केएल राहुल लंडनमध्ये उपचार घेत आहे.
केएल राहुलच्या उजव्या मांडीला दुखापत झाली होती, त्यामुळे गेल्यावर्षी त्याच्यावर सर्जरी कऱण्यात आली होती. याच दुखापतीमधून केएल राहुल अद्याप पूर्णपणे सावरलेला नाही. मांडीची दुखापत त्याला अद्याप सतावत आहे. भारतीय संघानं इंग्लंडविरोधातील कसोटी मालिका 3-1 च्या फरकानं जिंकली आहे. त्यामुळे बीसीसीआय धोका न पत्कारता युवा खेळाडूंनाही संधी देऊ शकतं.