रणजी ट्रॉफी स्पर्धेतील सेमीफायनलचा सामना मुंबई विरुद्ध तामिळनाडू या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. दरम्यान या सामन्यात श्रेयस अय्यर मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलचा सामना मुंबई आणि तामिळनाडू या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना येत्या २ मार्चपासून मुंबईतील बीकेसीच्या मैदानावर रंगणार आहे. श्रेयस अय्यर पूर्णपणे फिट असून मुंबईच्या रणजी ट्रॉफीतील सेमीफायनलच्या सामन्यासाठी उपलब्ध राहणार आहे.' (हेही वाचा - Team India Salary: BCCI कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या पगारात करणार वाढ, बोनसही देणार!)
श्रेयस अय्यरला रणजी ट्रॉफी खेळण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र श्रेयस अय्यरने दुखापतग्रस्त असल्याचं नाटक केलं. त्यामुळे टीम मॅनेजमेंट या दोन्ही खेळाडूंवर नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने मोठा खुलासा केला आहे. रोहित शर्माने स्पष्ट केलं आहे की, ज्या खेळाडूंना कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे, अशाच खेळाडूंना संघात स्थान दिलं जाईल. रोहितच्या मते कसोटी क्रिकेट हा क्रिकेटमधील सर्वात आव्हानात्मक फॉरमॅट आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेट खेळणं सर्वांनाच जमेल असं नाही.
वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी मिळाली. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पदार्पण करणाऱ्या सरफराज खान, आकाश दीप आणि ध्रुव जुरेल यांनी मिळून दमदार खेळ केला. भारतीय संघाच्या विजयात या तिघांनी मोलाचं योगदान दिलं आहे. या शानदार कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने कसोटी मालिकेत ३-१ ने विजयी आघाडी घेतली आहे.