PC-X

Athiya Shetty-KL Rahul Baby Girl Name: क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्री केएल राहुल आणि पत्नी अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांना काही दिवसांपूर्वी कन्यारत्न प्राप्त झाले होते. लेकीच्या आगमनाने दोघेही सध्या आनंदात आहेत. केएल राहुलच्या (KL Rahul) वाढदिवसानिमित्त, या जोडप्याने त्यांच्या चुमीकल्या परीचे नाव उघड केले आहे. त्याशिवाय एक फोटो शेअर केला आहे. पोस्टमध्ये दोघांनीही लिहिले की, 'आमची मुलगी, आमचे सर्वस्व - इवारा.' पोस्टमध्ये इवारा पाठमोरी आहे. पण केएल राहुलच्या चेहऱ्यावर हास्य आणि अथियाच्या डोळ्यात लेकीसाठी प्रेम हे दिसत आहे.

मुलीचे नाव जगजाहीर

दोघांनीही त्यांच्या मुलीचे नाव इवारा ठेवले आहे. इवारा म्हणजे 'देवाची देणगी' असा होतो. त्यांच्या या पोस्टवर कलाकारांनी लिलिध प्रतिक्रिया दिल्या आहेत. आज केएल राहुलचा 33 वा वाढदिवस आहे. त्या निमित्त दोघांनीही मुलीचे नाव जाहीर केले

 

View this post on Instagram

 

A post shared by KL Rahul👑 (@klrahul)

मार्चमध्ये मुलीला दिला जन्म

मार्चमध्येच, या जोडपे पालक झाले. ही बातमी त्यांनी एका सुंदररित्या जाहीर केली होती. ज्यामध्ये दोन हंस दिसत होते आणि त्यावर लिहिले होते, 'मुलीचा जन्म.' तेव्हापासून चाहते त्यांच्या लेकीविषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक होते.