KKR vs RR, IPL 2019: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 12 व्या सीझनमधील आज (25 एप्रिल) कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) संघामध्ये लढत होणार आहे. तर ईडन गार्डनच्या मैदानावर आजचा सामना खेळवण्यात येणार आहे.
आयपीएलच्या सुरुवातीला कोलकाता संघाने दमदार खेळी करत विजय मिळवला. मात्र मध्येच आता त्यांना पराभव स्विकारावा लागत आहे. संघाने आतापर्यंत 10 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर सहाव्या क्रमांकावर आपले नाव कोरले आहे. मात्र प्लेऑफमध्ये जाण्यासाठी कोलकाताच्या संघाला होणारे पुढील चार सामने जिंकणे आवश्यक आहे. तर आजचा सामन्याचा लाईव्ह थरार पाहण्यासाठी येथे क्लिक करा. (IPL 2019: 'मुंबई इंडियन्स' खेळाडूंवर संकटांची मालिका कायम, 'अलझारी जोसेफ'च्या दुखापती नंतर हा वेगवान बॉलर घेणार संघात एंट्री!)
संभावित खेळाडू संघ:
कोलकाता नाइट राइडर्स: दिनेश कार्तिक (कर्णधार), सुनील नरेन, आंद्रे रसेल, कार्लोस ब्रैथवेट, जो डेनली, लॉकी फग्र्यूसन, क्रिस लिन, रॉबिन उथप्पा, हैरी गर्नले, कुलदीप यादव, पीयूष चावला, नीतीश राणा, संदीप वॉरियर, के.सी. करियप्पा, शुभमन गिल, श्रीकांत मुंधे, निखिल नाइक, पृथ्वी राज और प्रसिद्ध कृष्णा.
राजस्थान रॉयल्स: अजिंक्य रहाणे, कृष्णप्पा गौतम, संजू सैमसन, श्रेयस गोपाल, आर्यमान बिड़ला, एस. मिधुन, प्रशांत चोपड़ा, स्टुअर्ट बिन्नी, राहुल त्रिपाठी, बेन स्टोक्स, स्टीव स्मिथ (कर्णधार), जोस बटलर, जोफ्रा आर्चर, ईश सोढी, धवल कुलकर्णी, महिपाल लोमरोर, जयदेव उनादकट, वरुण एरॉन, ओशेन थॉमस, शशांक सिंह, लियाम लिविंगस्टोन, शुभम रंजाने, मनन वोहरा, एश्टन टर्नर, रियान पराग.