IPL 2019: 'मुंबई इंडियन्स' खेळाडूंवर संकटांची मालिका कायम, 'अलझारी जोसेफ'च्या दुखापती नंतर हा वेगवान बॉलर घेणार संघात एंट्री!
Mumbai Indians (Photo Credits: File Photo)

IPL 2019: आयपीएलच्या (IPL) सुरवाती पासूनच फॉर्म मध्ये खेळत असणाऱ्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) च्या संघातील खेळाडूंना प्रतिस्पर्ध्यांसोबत दुखापतींचा देखील सामना करावा लागत आहे. एकीकडे सर्वच संघांमध्ये आयपीएलच्या प्ले-ऑफ्स मध्ये जाण्यासाठी चुरस रंगत असताना मुंबई टीमच्या गोलंदाजांना पाठोपाठ दुखापतीना समोर जावं लागतंय. मुंबईच्या संघातील आल्झारी जोसेफ (Alzari Joseph) या वेगवान बॉलरच्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला अचानक आयपीएल मधून बाहेर करत त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या बोरन हेंड्रीक्स (Boren Hendricks) या बॉलरला नव्याने सामील करण्यात येणार आहे.

मुंबईच्या टीम मधील न्यूझीलँडचा वेगवान बॉलर ऍडम मिलने (Adam MIilne) याला सुरवातीच्या मॅच मध्ये दुखापत झाल्यावर तो आयपीएल 2019 मधून बाहेर पडला होता. त्यामुळे मुंबईने त्याच्या बदली खेळाडू म्हणून आल्झारी जोसेफला संघात घेतले होते. संघात आल्यावर आल्झारीने देखील पहिल्याच काही मॅच मध्ये दणदणीत परफॉर्म करत इतर संघांमध्ये आपली दहशत निर्माण केली होती.6 एप्रिलला सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करताना 12 धावांतच 6 विकेट घेत सगळ्यांना चकित केलं होतं. या सोबतच त्याला आयपीएल मधील सर्वोत्तम गोलंदाजाचा मान देखील मिळाला होता. IPL 2019: आयपीएलच्या शेवटच्या सामन्याची तारीख आणि ठिकाणाची झाली घोषणा; असे असेल वेळापत्रक

बोरन हेंड्रीक्सच्या पूर्व सामन्यांविषयी:

  • हेंड्रीक्स याआधी आयपीएलमध्ये 2014 आणि 2015 ला किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडून खेळला आहे. त्याने आयपीएलमध्ये 7 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आहेत.
  • 36 धावांत 3 विकेट्स ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. हेंड्रीक्सने 2014 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध T-२० सामन्यातून जागतिक क्रिकेटमध्ये पदार्पण केले.-
  • आजवर त्याने T-२० सामन्यात 8.31 च्या इकोनॉमी रेटने 89 विकेट्स घेतल्या आहेत.

मुंबई इंडियन्स सध्या आयपीएलच्या  6 सामन्यात विजय मिळवून पॉईंट्स टेबल वर तिसऱ्या स्थानी आहे. येत्या 26 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे मुंबई इंडियन्सचा पुढील सामना रंगणार आहे.