Rajiv Gandhi International Stadium (Photo Credits: Wikimedia Commons)

23 मार्चपासून भारतामध्ये आयपीएल (IPL) ची धूम सुरु आहे. देशातील 8 महत्वाच्या शहरातील 8 संघ या 12 व्या सिझनमध्ये सामील झाले आहेत. ‘आयपीएल’च्या या हंगामातील पहिला सामना, चेन्‍नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई (MA Chidambaram Stadium, Chennai) इथे पार पडला. आता आयपीएलचा शेवटचा सामना 12 मे रोजी हैद्राबाद (Hyderabad) च्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम (Rajiv Gandhi International Stadium) इथे पार पडणार आहे.

आधी हा सामना चेन्नई (Chennai) इथे पार पडणार होता. मात्र तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन (TNCA) ने मैदानाचे तीन स्टॅण्डस उघडण्यास परवानगी दिली नाही, त्यामुळे हा शेवटचा सामना हैद्राबाद येथे पार पडणार आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार चेन्नईमध्ये 7 मे रोजी पहिला क्वालीफायर (Qualifier 1) सामना खेळला जाईल. तर विशाखापट्टणम (Vizag) मध्ये टूर्नामेंटचा एलिमिनेटर आणि दुसरा क्वालिफायर खेळला जाईल. हे दोन्ही सामने अनुक्रमे 8 व 10 मे रोजी खेळले जाणार आहेत. (हेही वाचा: VIVO IPL 12 चे वेळापत्रक PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा)

वेळापत्रकानुसार हे सामने हैद्राबादमध्ये खेळवले जाणार होते, मात्र लोकसभा निवडणुका चालू असल्याने सामन्यांची ठिकाणे बदलण्यात आली आहेत. दरम्यान, आयपीएल 12 चे रविवारी रात्रीपर्यंत 39 सामने खेळले गेले आहेत. रविवारी रात्री पराभव होऊनही चेन्नई सुपर किंग्ज संघ सध्या शीर्षस्थानी आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर अजूनही आठव्या म्हणजेच शेवटच्या स्थानी आहे.