DC vs KKR , IPL 2019: दिल्ली कॅपीटल्स विरुद्ध कोलकाता नाईटरायडर्स Live Streaming इथे पाहू शकता
Kolkata Knight Riders vs Delhi Capitals | (Photo Credits: File Photo)

KKR vs DC Live Streaming: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) अर्थातच आयपीएल (IPL 2019) स्पर्धेच्या 12 व्या पर्वातील 26 वा सामना शुक्रवारी ईडन गार्डन्स (Eden Gardens) मैदानावर शुक्रवारी खेळला जात आहे. हा सामना कोलकाता नाईटरायडर्स (Kolkata Knight Riders) आणि दिल्ली कॅपीटल्स (Delhi Capitals) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघातील गेल्या 12 वर्षांतील इतिहास पाहता दिल्लीचा संघ या मैदानावर कोलकाता संघास केवळ एकदाच पराभूत करु शकला आहे. 2012 मध्ये या संघाने दिल्लीने कोलाकात संघाला आठ गडी राखून पराभूत केले होते. तेव्हा कोलकाताने 9 गडी बाद 97 धावा केल्या होत्या. दिल्लीने केवळ दोन गडी बाद अशा स्थितीत आपले लक्ष्य गाठले. आजच्या सामन्यात विजय मिळवून कॅपिटल्स संघ आपला सल्लागार सौरव गांगुली याला विजयी भेट देऊ शकतो. दरम्यान, सामना सुरु असून दिल्ली कॅपीटल्सने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या पर्वातील दोन्ही संघांचा सामना या आदी फिरोजशाह कोटला मैदानावर 30 मार्च रोजी झाला होता. तेव्हा दिल्लीने कोलाकात संघाला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले होते. या पराभवाचा वचपा काढण्याचा पुरेपूर प्रयत्न कोलकाता संघ करेल अशी आशा आहे. कोलकाता आणि दिल्ली संघात आतापर्यंत (आयपीएल सुरु झाल्यापासून) एकूण 24 सामने खेळले गेले आहेत. यातील 13 सामने कोलकाता संघाने जिंकले आहेत. तर, 10 सामने दिल्लीने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णयीत राहिला. त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही संघ कशी कामगिरी करतात याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा,'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनीचा पारा चढला; राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या अटीतटीच्या सामन्यात 'No Ball' च्या निर्णयावर वाद (Watch Video) )

दिल्ली कॅपीटल्स विरुद्ध कोलकाता नाईटरायडर्स नाणेफेक

कोलकाता नाईटरायडर्स (Kolkata Knight Riders) आणि दिल्ली कॅपीटल्स (Delhi Capitals) हा सामना आपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहू शकता. तसेच, या सामन्याचे ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग आपण Hotstar पाहू शकता. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी Hotstar येथे क्लिक करा.

कोलकाता नाईटरायडर्स आणि दिल्ली कॅपीटल्स संघातील संभाव्य खेळाड

दिल्ली कॅपीटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), आवेश खान, ट्रेंट बोल्ट, शिखर धवन, बंडारू अयप्पा, अंकुश बैन्स, संदीप लमिछने, मनज्योत कालरा, अमित मिश्रा, क्रिस मोरिस, कॉलिन इनग्राम, कॉलिन मुनरो, ऋषभ पंत, अक्षर पटेल, हर्षल पटेल, कीमो पॉल, कगिसो रबाडा, जलज सक्सेना, शेरफेन रूदरफोर्ड, इशांत शर्मा, पृथ्वी शॉ, राहुल तेवतिया, हनुमा विहारी, नाथू सिंह.

कोलकाता नाइटराइडर्स : दिनेश कार्तिक (कर्णधार), रॉबिन उथप्पा, क्रिस लिन, शुभमन गिल, नितिश राणा, आंद्रे रसेल, कार्लोस ब्रैथवेट, सुनील नरेन, पीयूष चावला, कुलदीप यादव, निखिल नाइक, जोए डेनली, श्रीकांत मुंडे, संदीप वारियर, प्रसिद्ध कृष्णा, लॉकी फर्गुसन, हैरी गर्नी, केसी करियप्पा, यारा पृथ्वीराज.