KKR vs CSK, IPL 2020 Live Stream: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13व्या मोसमातील 21व्या सामन्यात महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) सामना दिनेश कार्तिकच्या कोलकाता नाईट रायडर्सशी (Kolkata Knight Riders) होईल. मागील सामन्यात सीएसकेनने (CSK) पंजाबविरुद्ध 10 गडी राखून विजय मिळविला होता, तर केकेआरला (KKR) मागील सामना दिल्लीच्या कॅपिटल्सविरूद्ध पराभव पत्करावा लागला होता. केकेआर आणि सीएसके यांच्यातील आजचा सामना अबू धाबी येथील शेख ज़ायद क्रिकेट स्टेडियम (Shaikh Zayed Stadium) पार पडणार आहे. कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्जमधील आजचा सामना भारतीय वेळेनुसार आज 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता टॉस होणार असून सामना 7.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Disney+ Hotstar अॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (KKR vs CSK IPL 2020 Dream11 Team: फाफ डू प्लेसिस, इयॉन मॉर्गन, आंद्रे रसल यांसह 'या' खेळाडूंचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केल्याने अधिक पॉईंट मिळण्याची शक्यता; वाचा सविस्तर)
केकेआर आणि सीएसके आजच्या सामन्यातून गुणतालिकेत आपले स्थान सुधरवण्याचा प्रयत्न करतील. सध्या 4-4 गुणांसह केकेआर चौथ्या, तर सीएसके पाचव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघांना हा सामना जिंकून गुण टेबलमध्ये आपले स्थान मजबूत करू पाहतील. हंगामात आजवर कोलकाताने 4 पैकी 2 सामने जिंकले आहेत आणि 2 गमावले आहेत, दुसरीकडे चेन्नईने 5 पैकी केवळ 2 सामने जिंकले आहेत. मोसमातील सुरुवातीचा सामना जिंकल्यानंतर चेन्नईने सलग 3 सामने गमावले. त्यानंतर त्यांनी मागील सामन्यात पंजाबला 10 गडी राखून पराभूत केले.
कोलकाता नाईट रायडर्स संघ: दिनेश कार्तिक (कॅप्टन/विकेटकीपर), शुभमन गिल, सिद्धेश लाड, सुनील नारायण, पॅट कमिन्स, इयन मॉर्गन, वरुण चक्रवर्ती, टॉम बंटन, राहुल त्रिपाठी, क्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ, निखिल नाईक, अली खान, आंद्रे रसेल, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लोकी फर्ग्युसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंह, संदीप वारियर, शिवम मावी.
चेन्नई सुपर किंग्स संघ: एमएस धोनी (कॅप्टन/विकेटकीपर), इमरान ताहिर, मिशेल सॅटनर, जोश हेजलवुड, शार्दुल ठाकूर, सॅम कुरन, एन जगदीसन, केएम आसिफ, मोनू कुमार, आर साई किशोर, रुतुराज गायकवाड, कर्ण शर्मा, मुरली विजय, अंबाती रायुडू, फाफ डु प्लेसिस, शेन वॉटसन, केदार जाधव, ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा, लुंगी एनगीडी, दीपक चहर, पियुष चावला.
ing: